आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gudhi Padwa On 11 To Celebrate The Festival And Its Significance Know Why

गुढीपाडवा : जाणून घ्या, का साजरा करतात हा सण आणि याचे महत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू नववर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्यापासून सुरू होते. यंदा गुढीपाडवा 11 एप्रिल रोजी साजरा होत आहे. या दिवसापासून संवत्सर बदलते. भारतीय पंचांगही याच दिवसावर आधारित आहेत. पुराणकथांनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची रचना केली म्हणून हा दिवस कल्पादी, सृष्ट्यादी, युगादी, सत्ययुग आणि संवत्सराचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणूनही साजरा करतो. या दिवसापासून चैत्र नवरात्राला प्रारंहोतो. घरोघरी धार्मिक अनुष्ठान, व्रतवैकल्ये, धान्याची पेरणी आणि नंदादीप पूजन आदी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नवमीपर्यंत हे कार्यक्रम चालतात.