आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोट्यधीश मुलीचा अघोरी आणि नागा साधूंच्या रहस्यमयी जीवनावर रिसर्च

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बडोदा - पुढच्या वर्षी उज्जैनमध्ये सिंहस्थ महाकुंभचे आयोजत होत आहे. 24 एप्रिलपासून 24 मेपर्यंत चालणार्‍या या सिंहस्थ मेळ्यामध्ये या वर्षी जवळपास 50 हजार साधू नागा संन्याशी होण्याचा अंदाज आहे. नागा साधू किंवा अघोरींविषयी ऐकताच डोळ्यासमोर मोठ-मोठ्या जटा, डोळ्यांमध्ये तेज असलेले अघोरी आणि नागा साधूंची आक्रमता दिसून येते. याच कारणामुळे सामान्य व्यक्ती त्यांच्याजवळून जाण्यासाही घाबरतो. अशा स्थितीमध्ये त्यांच्यासोबत राहून त्यांच्या रहस्यमयी जीवनाचा अभ्यास करणे प्रत्येकाच्या आवाक्यातील गोष्ट नाही. परंतु वडोदराच्या एका धनाड्य कुटुंबातील उच्चशिक्षित आणि पेशाने वकील असलेल्या तरुणीने विविध नागा साधू आणि अघोरींसोबत राहून त्यांच्याविषयी अशा गोष्टी जाणून घेतल्या, ज्या सहजपणे नागा साधू कोणालाही सांगत नाहीत.

बडोदा येथील इलोरा पार्कमध्ये राहणार्‍या 28 वर्षीय पलना पटेलने जुनागढच्या गुहा, कुंभमेळे, काशी आणि वाराणसीमध्ये राहून अनेक दिवस अघोरी आणि नागा साधूंची दिनचर्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिली आहे. पलना सांगते की, हे साधू पूर्णवेळ स्वतःच्या शरीराला कष्ट देत अनुष्ठान आणि सिद्धी प्राप्त करण्याच्या मागे असतात. यांचा नित्यक्रम सैन्याच्या जवानांप्रमाणे आहे. कडाक्याची थंडी असो किंवा मुसळधार पाऊस, यांची साधना चालूच असते. नागा साधू पहाटेच उठून स्नान करतात. योग आणि आपापल्या पद्धतीने साधना करतात.

पुढील स्लाईड्सवर वाचा
- तेलंग स्वामी मल-मूत्रने करत होते काशी-विश्वनाथच्या ज्योतिर्लिंगाचा अभिषेक
- अघोरी कशाप्रकारे कसतात शव-साधना?
- स्मशानभूमीत का म्हणतात ‘शहेरे खामोश’?
- कशाप्रकारे होते नागा साधूंची तंग-तोड विधी?
बातम्या आणखी आहेत...