आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guru Pradosh Today: Know The Fast Method And Significance

गुरु प्रदोष आज : जाणून घ्या, व्रताचा संपूर्ण विधी आणि महत्त्व

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार प्रत्येक मासातील त्रयोदशी तिथीला महादेवा निमित्त प्रदोष व्रत केले जाते. ही तिथी ज्या दिवशी असते त्या दिवसाच्या संयोगाने या व्रताचे महत्त्व अधिकच वाढते. पंचांगानुसार या महिन्यात 23 जुलै, गुरुवारी प्रदोष असल्यामुळे गुरु प्रदोष योग जुळून आला आहे. धर्म ग्रंथानुसार गुरुप्रदोष व्रत केल्याने शत्रूंचा नाश होतो. येथे जाणून घ्या, या व्रताचा विधी.
- प्रदोष व्रतामध्ये पाणी न पिता व्रत करावे. सकाळी स्नान केल्यानंतर शंकर पार्वती आणि नंदीला पंचामृताने अभिषेक करावा. त्यानंतर बिल्वपत्र, गंध, अक्षता, फुल, सुपारी, लवंग अर्पण करून पूजा करावी.

- संध्याकाळी स्नान करून पुन्हा महादेवाची पंचोपचार पूजा करावी.

- महादेवाला साखर-तूप मिश्रित पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

- दाही दिशांना दिवे लावावेत. दिवा लावताना शिव स्तोत्र, मंत्राचा जप करावा.

- रात्री जागरण करावे.

- अशा प्रकारे सर्व इच्छापूर्तीसाठी साधकाने प्रदोष व्रताच्या धार्मिक विधीचे नियम आणि संयमाने पालन करावे.

(येथे फोटोचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)