आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Guru Purnima Special Know About 10 Great Masters

या 10 महान गुरूंच्या शिष्यांनी शस्त्र आणि शास्त्राने जिंकले संपूर्ण जग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये गुरूला देवापेक्षाही श्रेष्ठ मानण्यात आले आहे. गुरु शब्दामध्येच गुरूच्या महिमेचे वर्णन आहे. 'गु'चा अर्थ आहे अंधकार आणि 'रु'चा अर्थ प्रकाश. यामुळे गुरूचा अर्थ, अंधकारातून प्रकाशाकडे घेऊन जाणारा असा होतो. गुरूच शिष्याला जीवनात यशस्वी होण्याचा मार्ग दाखवतो. जीवनात गुरुचे महत्त्व सांगण्यासाठी आषाढ मासातील पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमेचा उत्सव साजरा केला जातो.

या दिवशी गुरूची पूजा तसेच त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्याचे विशेष महत्त्व आहे. या वर्षी गुरुपौर्णिमेचा उत्सव 31 जुलै, शुक्रवारी आहे. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला अशा काही गुरूंची माहिती देत आहोत, ज्यांनी केवळ गुरुचे महत्त्व सिद्ध केले नाही तर समाजासाठी असे शिष्य निर्माण केले जे सर्वांचा आदर्श ठरले. या महान गुरूंची नावे खालील प्रमाणे आहेत...

1- महर्षी वेदव्यास
2- परशुराम
3- महर्षी वशिष्ठ
4- ब्रह्मर्षी विश्वामित्र
5- गुरु सांदिपनी
6- गुरु द्रोणाचार्य
7- कृपाचार्य
8- आचार्य चाणक्य
9- स्वामी रामकृष्ण परमहंस
10- महर्षि अरविंद
परशुराम
परशुराम हे भगवान विष्णूंचा सहावा अवतार समजले जातात. जमदग्नी व रेणुकामाता यांच्या पोटी यांचा जन्म झाला. ब्राह्मण असून क्षत्रियांचे सर्व गुण यांच्यात होते, म्हणूनच त्यांना "शरादपि शापादपि" असे म्हणतात. भगवान शंकरांकडून त्यांनी परशू हे शस्त्र घेतले आणि अनेक विद्या आत्मसात केल्या. त्याच विद्यांच्या जोरावर त्यांनी दुष्ट आणि प्रजेला जाच करणाऱ्या राजांचा बंदोबस्त केला. त्याच वेळी त्यांनी सहस्रार्जुनाला ठार केले. पुढे राजांना जिंकून ताब्यात घेतलेली जमीन त्यांनी ऋषिकुलाला देऊन ते महेन्द्र पर्वतावर तप करण्यासाठी निघून गेले. भीष्म, द्रोणाचार्य हे त्यांचे महान शिष्य होते.

या गुरूंची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...