आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुरुवारी अशा पद्धतींनी करा शिव पूजा, भाग्याशी संबंधित समस्या होतील दूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये गुरुवार हा दिवस गुरु ग्रहाच्या उपासनेचा मानण्यात आला आहे. देवगुरु भगवान शिव जगतगुरु रूपातही पूजनीय आहेत. गुरु बृहस्पती यांनीही महादेवाच्या कृपेने सुराचार्य म्हणजे देवगुरुचे पद प्राप्त केले आहे. यामुळे गुरुवारी करण्यात येणारी शिव पूजा गुरुदोषाची शांती करणारी मानली गेली आहे.

गुरु दोषामुळे कमजोर बुद्धी, वैवाहिक बाधा किंवा दाम्पत्य कलह आणि अपत्य पिडेमधून जावे लागते. कुंडलीत गुरु ग्रहाची अशुभ स्थिती असेल तर महादेव पूजेने गुरुदोष दूर होऊ शकतात.

याच पूजा परंपरेमध्ये गुरुवारसाठी सांगण्यात येत आहे महादेवाच्या पूजेचा सोपा उपाय. हा उपाय गुरु दोषाच्या शांतीसाठी प्रभावी मानण्यात आला आहे. येथे जाणून घ्या, हा उपाय आणि शिव आणि गुरु पूजेचा भाग्योदय करणारा सोपा विधी...

- या दिवशी संध्याकाळी स्नान करून शिवलिंगावर गंध, फुल, अक्षता अर्पण करून विशेषतः साखर मिश्रित पाण्याने अभिषेक करावा.
- शिवलिंगावर साखर मिश्रित पाण्याने अभिषेक केल्यास बुद्धी दोष दूर होतो तसेच इतर सर्व गुरु दोष नष्ट होतात असे मानले जाते.

- यानंतर शुद्ध पाण्याने अभिषेक करून महादेवाला धोतरा, बेलाचे पान, पांढरे वस्त्र ‘ॐ नम: शिवाय’ या मंत्राचा उच्चार करीत अर्पण करावे. गहू आणि हरभरा डाळीपासून तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा.

- शिव रुद्राष्टक, शिव पंचाक्षरी किंवा शिव मानस पूजेचे स्मरण करावे.

- शुद्ध तुपाचा दिवा आणि कापूर लावून महादेवाची आरती करावी.

अशाप्रकारे महादेवासोबत देवगुरुच्या प्रसन्नतेसाठी धन व सौभाग्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी पुढील स्लाईड्सवर सांगण्यात आलेले उपायही अवश्य करा...