आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hanuman Ahtami The Arjunas Chariot Was Burnt After Flying Of Hanuman

हनुमान उडून जाताच जळून राख झाला अर्जुनाचा रथ, जाणून घ्या, का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
14 डिसेंबरला रविवारी हनुमान अष्टमी आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानाशी संबंधित काही रोचक माहिती सांगत आहोत. महाभारतानुसार, कौरव-पांडवांच्या युद्धकाळात अर्जुनाच्या रथावर स्वतः हनुमान विराजित होते आणि युद्ध समाप्तीनंतर ते अंतर्धान झाले.

- कौरव-पांडवांच्या युद्धामध्ये सर्वात शेवटी भीम आणि दुर्योधनाचे युद्ध झाले. भीमाने युद्ध नियमांचे उल्लंघन करून दुर्योधनाला पराभूत केले. दुर्योधनला मरणासन्न अवस्थेत सोडून पांडव निघून गेले. तेव्हा श्रीकृष्णाने सर्वप्रथम अर्जुनाला गांडीव धनुष्य घेऊन रथाच्या खाली उतरण्यास सांगितले. अर्जुनाने तसेच केले आणि त्यानंतर स्वतः श्रीकृष्ण रथावरून खाली उतरले.

- श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमानही उडून गेले. त्यानंतर लगेच पाहता-पाहता संपूर्ण रथ जळून राख झाला. हे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णाला याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, रथ दिव्य शस्त्रांच्या आघाताने पहिलेच जळाला होता, केवळ मी रथावर बसून होतो म्हणून भस्म झाला नाही. जेव्हा तुझे कार्य पूर्ण झाले तेव्हा मी रथ सोडला. त्यामुळे हा रथ आता भस्म झाला आहे.

महाभारतातील एका प्रसंगानुसार गंधमादन पर्वतावर भीमाला श्रीहनुमानाने दर्शन दिले होते. हा संपूर्ण प्रसंग जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लीक करा...