आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुनाच्या रथावर का बसले होते हनुमान, ते निघून जाताच काय घडले?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र महिन्याच्या पोर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. या वेळी 11 एप्रिल, मंगळवारी हनुमान जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानासंबंधीत काही रंजक गोष्टी सांगणार आहोत. महाभारता प्रमाणे, युध्दाच्या वेळी अर्जुनाच्या रथावर स्वयं हनुमान विराजित होते. युध्द समाप्त झाल्यावर काय झाले आणि का हनुमान अर्जुनाच्या रथावर विराजित होते. हे आम्ही सांगत आहोत...

यामुळे जळाला अर्जुनाचा रथ
महाभारता प्रमाणे जेव्हा कौरव सेनेचा नाश झाला तेव्हा दुर्योधन पळून एका तलावात लपला. जेव्हा पांडवांना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांना दुर्योधनाला युध्दासाठी आव्हान केले. दुर्योधन तलावातून बाहेर निघाला आणि भीमने त्याला पराजित केले. दुर्योधनाला मरणासन्न अवस्थेत सोडून पांडव आपआपल्या रथांमध्ये कौरवांच्या शिविरमध्ये आले. तेव्हा श्रीकृष्णने अर्जुनाला अगोदर रथातुन उतरायला सांगितले आणि नंतर ते स्वत: उतरले.

श्रीकृष्ण उतल्यावर अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमान देखील उडून गेले. तेव्हा एका क्षणात अर्जुनाचा रथ जळून खाक झाला. हे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णाला याचे कारण विचारले? तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, हा रथ दिव्यास्त्रांच्या प्रहाराने अगोदरच जळाला होता. फक्त मी बसलेलो असल्यामुळेच हा रथ भस्म झाला नव्हता. जेव्हा तुमचे काम पुर्ण झाले तेव्हाच मी हा रथ सोडला. यामुळे आता हा रथ भस्म झाला.

हनुमान अर्जुनाच्या रथावर का बसले, हा संपूर्ण प्रसंग जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...