Home | Jeevan Mantra | Dharm | hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi

सर्व दुःख दूर करून सुख-समृद्धी प्रदान करते हनुमान चालीसा, वाचा मराठी अर्थासह

जीवनमंत्र डेस्क | Update - Apr 11, 2017, 08:37 AM IST

धार्मिक मान्यतेनुसार कलियुगात हनुमान एकमेव जीवित देवता आहेत. हनुमानाला चिरंजीव म्हटले जाते.

 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  धार्मिक मान्यतेनुसार कलियुगात हनुमान एकमेव जीवित देवता आहेत. हनुमानाला चिरंजीव म्हटले जाते. हे आपल्या भक्तांचे दुःख दूर करून त्यांना सुख-समृद्धी प्रदान करतात. हनुमानाच्या कृपेने तुलसीदास यांना भगवान श्रीरामचे दर्शन झाले होते. हनुमानाचा महिमा लक्षात घेऊन तुलसीदास यांनी हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसाची रचना केली. आज (11 एप्रिल, मंगळवार) हनुमान जयंती आहे. या दिवशी आणि नियमितपणे हनुमान चालीसाचे पाठ केल्यास भक्ताचे सर्व दुःख, अडचणी दूर होतात. आज आम्ही तुमच्यासाठी हनुमान चालीसा घेऊन आलो आहोत.

  रोज हनुमान चालिसा पठण करणाऱ्यांसाठीही हे सर्व ग्राफिक्स अत्यंत उपयोगी आहेत. मोबाईलमध्ये हे सर्व सेव्ह केल्यास सकाळी, प्रवास करताना किंवा कोणत्याही वेळी तुम्ही ते पठन करू शकता. त्यासाठी पुस्तक जवळ बाळगण्याची गरज नाही. त्यामुळे तुमच्या मित्रांनाही ही लिंक नक्की शेअर करा.

  पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, संपूर्ण हनुमान चालिसा...

 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  गुरू महाराजांच्या चरण स्पर्शाने मन पवित्र करून रघुवीरांच्या यशाचे वर्णन करतो. त्यातून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्ती होईल. हे पवन कुमार मी तुमचे स्मरण करतो. मला शारिरीक बळ, सद्बुद्धी आणि ज्ञान द्या. तसेच माझ्या दुःख आणि दोषांचे निराकरण करा.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हनुमानाचा जयजयकार. तुमचे ज्ञान आणि गुण अपार आहेत. स्वर्ग लोक, भूलोक आणि पाताळ अशा तिन्ही लोकांमध्ये तुमची किर्ती आहे.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे अंजनी नंदना तुमच्याएवढे बलवान दुसरे कोणीही नाही. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे महावीर बजरंग बलि, तुम्ही थोर पराक्रमी आहात. तुम्ही वाईट विचार दूर करता आणि चांगले विचार असणाऱ्यांना मदत करता. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  तुमचे सोनेरी अंग, कर्ण कुण्डल आणि कुरळे केस अत्यंत शोभून दिसतात. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हातातील वज्र, ध्वजा आणि खांद्यावर जानवे शोभून दिसते. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे शंकराच्या अवतारा तुमच्या पराक्रमाची चर्चा अवघ्या जगात होते. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  तुम्ही अत्यंत विद्वान आणि गुणी आहात, नेहमी श्री रामाचे काम करण्यासाठी आतुर असता.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  श्रीराम चरित्र सुनण्यात तुम्हाला अत्यंत आनंद येतो. सीता आणि लक्ष्मणासह श्रीराम तुमच्या हृदयात वास करतात. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  सूक्ष्म रूम धारण करून तुम्ही सीता मातेला भेटले आणि महाकाय रूप घेत लंकाही जाळली. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  महाकाय रुपात राक्षसांचा संहार करत तुम्ही श्री रामांच्या आदेशाचे पालन केले.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  संजीवनी आणून तुम्ही लक्ष्मणाचे प्राण वाचवले, त्यामुळे आनंदलेल्या श्रीरामांनी तुम्हाला आलिंगन दिले.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  श्री रामांनी तुमचे तोंडभरून कौतुक करत, भरताएवढेच तुम्ही त्यांना प्रिय असल्याचे सांगितले.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हजार मुखांनी वर्णन करूनही तुमच्या याशाची गाथा गावी लागेल असे श्री राम म्हणाले.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  सनकांसारखे मुनी, ब्रह्मा, नारद, सरस्वती सर्व तुमचे गुणगाण करतात. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  यमराज, कुबेर असे सर्व दिशांचे रक्षक कवी, विद्वान, पंडित कोणीही तुमच्या यशाचे पुरेपूर वर्णन करू शकत नाही. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  सुग्रीवाची श्रीरामांशी भेट घडवून तुम्ही उपकार केले, त्यामुळेच ते राजा बनले. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  विभिषनाने तुमचा उपदेश पाळला आणि ते लंकापती बनले हेही सर्वांनाच ज्ञात आहे. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हजारो मैल अंतरावर असलेल्या सूर्याजवळ पोहोचायला हजारो वर्ष लागली, पण तुम्ही फळ समजून त्या सूर्यालाच गिळले.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  प्रभु रामचंद्राची अंगठी तोंडात ठेवून तुम्ही समुद्र पार केला, यात काहीही आश्चर्य नाही. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  जगात जे कठीण काम आहे ते सर्व तुमच्या कृपने सहज शक्य होतात.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  श्री रामचंद्राच्या द्वाराचे रक्षणकर्ते आहात, यामुळे या दारामध्ये तुमच्या आज्ञेशिवाय कोणालाही प्रवेश मिळत नाही म्हणजेच तुमच्या प्रसन्नतेशिवाय राम कृपा दुर्लभ आहे.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  जो कोणी तुम्हाला शरण येतो, त्याला सर्व प्रकारचा आनंद प्राप्त होतो आणि तुमची रक्षणकर्ते असल्यामुळे कोणाचीही भीती राहत नाही.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  तुमच्या व्यतिरिक्त तुमचा वेग कोणीही रोखू शकत नाही, तुमच्या गर्जनेने तिन्ही लोक थरथर कापतात.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  ज्या ठिकाणी महावीर हनुमानाचे नामस्मरण केले जाते, तेथे भूत, पिशाच भटकतसुद्धा नाहीत.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे वीर हनुमान! तुमचा निरंतर जप केल्याने सर्व रोग नष्ट होतात आणि पिडा दूर होते.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे बजरंगबली! विचार, कर्म करताना आणि बोलताना ज्याचे ध्यान तुमच्यामध्ये असते त्याला सर्व संकटातून तुम्ही मुक्त करता. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  तपस्वी राजा श्री रामचंद्र सर्वात श्रेष्ठ आहेत, त्यांचे सर्व कार्य तुम्ही सहजपणे पूर्ण केले. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  ज्या व्यक्तीवर तुमची कृपा राहते त्याने कोणतीही इच्छा व्यक्त केली तर त्याचे फळ त्याला आयुष्भर मिळत राहते.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  चारही युग सतयुग, त्रेता, द्वापर तसेच कलियुगात तुमचे यश पसरलेले आहे. जगामध्ये तुम्ही कीर्ती प्रकाशमान आहे.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे श्री रामाच्या लाडक्या ! तुम्ही सज्जनांची रक्षा आणि दुष्टांचा नाश करतात. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  तुम्हाला देवी जानकीकडून असे वरदान मिळाले आहे, ज्यामुळे तुम्ही कोणालाही आठ सिद्धी आणि नऊ निधी देऊ शकता. 
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  1.) अणिमा- यामुळे साधक कोणालाही दिसत नाही आणि कोणत्याही गोष्टीमध्ये प्रवेश करू शकतो.
  2.) महिमा- यामध्ये योगी स्वतःला खूप मोठे बनवतो. 
  3.) गरिमा- यामुळे साधक स्वतःला हवे तेवढे जड करू शकतो.
  4.) लघिमा- यामुळे साधक स्वतःला हवे तेवढे हलके करू शकतो.
  5.) प्राप्ति- यामिले इच्छित गोष्ट प्राप्त होते 
  6.) प्राकाम्य- यामुळे इच्छा केल्यास साधक पृथ्वीमध्ये सामावू शकतो आणि आकशात उडू शकतो.
  7.) ईशित्व- यामुळे सर्वांवर शासन करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते. 
  8.) वशित्व- यामुळे इतरांना वश केले जाऊ शकते.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  तुम्ही निरंतर श्रीरामाच्या चरणाजवळ असता यामुळे तुमच्याजवळ वृद्धावस्था आणि असाध्य रोगांचा नाश करण्यासाठी राम नामाची औषधी आहे.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  तुमचे भजन केल्याने श्रीराम प्राप्त होतात आणि जन्मजन्मांतरचे दुःख दूर होतात.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  शेवटच्या क्षणी श्री रघुनाथाच्या धाम जातील आणि पुन्हा जन्म घेतल्यास भक्ती करून श्रीराम भक्त रुपात ओळखले जातील.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे बजरंगबली! तुमची सेवा केल्याने सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतात, त्यामुळे इतर कोणत्या देवाची आवश्यकता राहत नाही.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे वीर हनुमान! जो तुमचे स्मरण करेल त्याचे सर्व संकट आणि दुःख नष्ट होतात.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  हे स्वामी बजरंगबली! तुमचा विजय असो, जयजयकार असो! तुम्ही माझ्यावर कृपाळू गुरूप्रमाणे कृपा करा.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  जो कोणी या हनुमान चालीसाचे 100 पाठ करेल तो सर्व बंधनातून मुक्त होईल आणि त्यांना परमानंद मिळेल.
 • hanuman jayanti 2017 read hanuman chalisa in marathi
  भगवान शंकराने ही हनुमान चालीसा लिहून घेतली आहे, यामुळे ते साक्षी आहेत की, जो व्यक्ती याचे पठण करेल त्याला निश्चितच यश प्राप्ती होईल.

Trending