आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान उडताच जळून राख झाला अर्जुनाचा रथ, हे होते कारण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चैत्र मासातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते. याच तिथीला पवनपुत्र हनुमानाचा जन्म झाला होता. या वर्षी हे उत्सव 4 एप्रिल, शनिवारी आहे. संपूर्ण देशात भक्तिभावाने हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी हनुमान मंदिरांमध्ये विशेष कार्यक्रमाचे आयोजन करून हनुमानाची विशेष पूजा केली जाते. हनुमान जयंतीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानाशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. महाभारतानुसार, कौरव-पांडवांच्या युद्धकाळात अर्जुनाच्या रथावर स्वतः हनुमान विराजित होते आणि युद्ध समाप्तीनंतर ते अंतर्धान झाले.

असा जळाला होता अर्जुनाचा रथ -
कौरव-पांडवांच्या युद्धामध्ये सर्वात शेवटी भीम आणि दुर्योधनाचे युद्ध झाले. भीमाने युद्ध नियमांचे उल्लंघन करून दुर्योधनाला पराभूत केले. दुर्योधनला मरणासन्न अवस्थेत सोडून पांडव निघून गेले. तेव्हा श्रीकृष्णाने सर्वप्रथम अर्जुनाला गांडीव धनुष्य घेऊन रथाच्या खाली उतरण्यास सांगितले. अर्जुनाने तसेच केले आणि त्यानंतर स्वतः श्रीकृष्ण रथावरून खाली उतरले. श्रीकृष्ण उतरताच अर्जुनाच्या रथावर बसलेले हनुमानही उडून गेले. त्यानंतर लगेच पाहता-पाहता संपूर्ण रथ जळून राख झाला. हे पाहून अर्जुनाने श्रीकृष्णाला याचे कारण विचारले. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितले की, रथ दिव्य शस्त्रांच्या आघाताने पहिलेच जळाला होता, केवळ मी रथावर बसून होतो म्हणून भस्म झाला नाही. जेव्हा तुझे कार्य पूर्ण झाले तेव्हा मी रथ सोडला. त्यामुळे हा रथ आता भस्म झाला आहे.

महाभारतातील एका प्रसंगानुसार गंधमादन पर्वतावर भीमाला श्रीहनुमानाने दर्शन दिले होते. हा संपूर्ण प्रसंग जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लीक करा...