आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त हनुमानच करु शकत होते हे काम, श्रीरामानेसुध्दा मान्य केली ही गोष्ट...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवपुराणाप्रमाणे, त्रेतायुगात श्रीरामाची सहायता करण्यासाठी आणि दृष्टांचा नाश करण्यासाठी महादेवाने वानर जातित हनुमानच्या रुपात अवतार घेतला होता. हनुमानाला महादेवाचा श्रेष्ठ अवतार म्हटले जाते. जेव्हा श्रीराम आणि लक्ष्मणावर एखादे संकट आले तेव्हा हनुमानने ते आपल्या बुध्दी आणि पराक्रमाने दूर केले. वाल्मीकि रामायणच्या उत्तर कांडमध्ये स्वयं श्रीराम म्हणाले आहे की, हनुमानाच्या पराक्रमामुळेच त्यांनी रावणावर विजय प्राप्त केला आहे. हनुमान जयंती 22 एप्रिल, शुक्रवारी आहे त्या निमित्ताने आम्ही तुम्हाला हनुमानाच्या काही पराक्रमांविषयी सांगत आहेत. जे पराक्रम दुसरे कोणीच करु शकले नसते.
अनेक राक्षसांचा वध
युध्दामध्ये हनुमानाने अनेक पराक्रमी राक्षसांचा वध केला. यामध्ये धूम्राक्ष, अकंपन, देवांतक, त्रिशिरा, निकुंभ हे प्रमुख होते. हनुमान आणि रावणामध्ये भयंकर युध्द झाले होते. रामायणानुसार भुकंप आल्यावर ज्या प्रकारे पर्वत हादरतात त्याच प्रकारे रावण हनुमानाने गालात मारल्यावर हादरला होता. हनुमानाचा हा पराक्रम पाहून तेथे उपस्थित सर्व वानरांमध्ये आनंद परसला होता.
हनुमानाने असे कोणकोणते काम केले आहे, जे करणे इतर कोणालाच शक्य नव्हते हे जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...