आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रातःस्मरण हनुमान मंत्र: शनिवारी या मंत्राचे स्‍मरण केल्‍यानंतर येणार नाही संकट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आयुष्‍यात चांगले संकल्‍प सोडल्‍यानंतर जे कार्य करत आहात त्‍याबद्दल आत्‍मविश्‍वास निर्माण होतो. चांगल्‍या नियमाचे पालन केल्‍यानंतर येणा-या आडचणी कमी होतात. हिंदू धर्मातील ग्रंथानूसार रूद्र अवतार श्रीहनुमानाची भक्‍ती केल्‍याने येणा-या संकटापासून मुक्‍ती मिळते. प्रत्‍येक दिवशी हनुमान मंत्राचे स्मरण केल्‍यानंतर तुमचा आत्‍मविश्‍वास वाढले व येणा-या संकटाचा सामना करता येईल. रोज मंत्राचे पठन करणे शक्‍य नसेल तर शनिवार किंवा मंगळवारी हनुमान मंत्राचे पठन करा.
काय आहे प्रातःस्मरण हनुमान मंत्र:
ब्रज्रांग पिंगकेशं कनकमयलसत्कुण्डलाक्रांतगंडं।
नाना विद्याधिनाथं करतलविधृतं पूर्ण कुंभं दृढं च।
भक्ता भीष्टाधिकारं विदधति त्रैलोक्य त्राणकारं
सकलभुवगं रामदूतं नमामि।
या मंत्राचे स्‍मरण करतेवेळी लाल वस्‍त्र परिधान करा. उत्‍तर दिशेकडे तोंड करून पूजेसाठी बसा. पूजेसाठी लाल चंदन, तिळाचे तेल, सुपारी, श्रीफळ, लाल फुलाची माळ हनुमानाला अर्पण करा. व मंत्राचे पठण करा. या मंत्राचे स्‍मरण केल्‍यानंतर शनिदेवाचा कोप होणार नाही. शनि दशापासून निर्माण होणारे तन, मन, धनाच्‍या समस्‍या दूर होतात. शिनदेव शिवशंकराचा अंश असल्‍यामुळे व श्रीहनुमान हे देखील शिवशंकराचे आवतार आसल्‍यामुळे हनुमाची भक्‍ती केल्‍यानंतर शनिदेव प्रसन्न होतात.