आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवन सुखी बनविण्यासाठी आवश्यक असलेला एक दैवी गुण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपले जीवन सुखी व शांत बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या दैवी गुणांपैकी एक श्रेष्ठ गुण आहे. आपली चूक विशाल हृदयाने स्वीकार करणे. या श्रेष्ठ गुणामुळे सहनशक्ती, सामना करण्याची शक्ती आदी शक्तींचा आपल्यामध्ये विकास होतो. लोकांची अशी समज आहे की चूक स्वीकार केल्याने समाजातील आपली प्रतिष्ठा कमी होते. पण, हा लोकांचा खरोखरच गैरसमज आहे. आपल्याला माहीतच आहे की नेहमी सत्याचाच विजय होतो.

आपल्या चुकीची कबुली देणे हे श्रेष्ठ कर्म असून, हे एक साहसी व्यक्तीचे लक्षण आहे. आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक महत्त्वाचा पैलू सत्यता आहे. जेव्हा आपण आपली चूक प्रामाणिकपणे व साहसाने कबूल करतो तेव्हा सत्याची साथ दिल्याने आपल्याला मानसिक समाधान मिळते. कधी-कधी इतरांविषयी द्वेषाची भावना आपल्या मनात जागृत होते.

दुसर्‍यांचे स्वभाव-संस्कार आपल्याला आवडत नाहीत, पण आपल्याला माहीत आहे का की सर्वशक्तिमान परमेश्वराला दयेचा आणि प्रेमाचा सागर का म्हणतात? कारण परमेश्वर नेहमीच आपल्याला आपल्या गुण-दोषांबरोबर स्वीकारतो. तो कधीच कोणाचा द्वेष करत नाही. सर्वगुणांचा, शक्तीचा सागर असलेला परमेश्वर आपल्या मुलांनासुद्धा आपल्याप्रमाणे सर्वगुणसंपन्न, सर्वशक्तिसंपन्न बनवित असतो, तसेच आपल्या शक्तिशाली किरणांचा वर्षाव आपल्यावर करत असतो. परमेश्वराप्रमाणे आपल्यालाही सर्वांचे गुण-अवगुण मोठय़ा मनाने सामावून घेता आले पाहिजेत.

आपली चूक आपण स्वीकार केल्याने आपण चुकीचे किंवा बरोबर सिद्ध होत नाही, तर आपल्यामध्ये असलेले नाते-संबंध निभावण्याची क्षमता दुसर्‍यांपेक्षा अधिक आहे हे सिद्ध होते. विश्व-बंधुत्वाची भावना साकार करण्यासाठी विशाल हृदयाने चूक स्वीकार करण्याच्या गुणाचे फार मोठे योगदान आहे. विश्व-बंधुत्वाची हीच भावना स्वत:वर, सर्वांवर आणि परमेश्वरावर आपल्याला प्रेम करायला शिकवते.