आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू पंचांगातील 11वा महिना चालू; जाणून घ्या, का आहे खास?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार 11 महिना माघ माघ मास असून या महिन्यात मघा नक्षत्रयुक्त पौर्णिमा असल्यामुळे यांचे नाव माघ आहे. या वर्षी माघ मासाची सुरुवात 21 जानेवारी बुधवारपासून होत आहे. धार्मिक दृष्टीकोनातून हा महिना खूप खास मानला जातो. धर्म ग्रंथानुसार या महिन्यात पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होऊन त्याला स्वर्गात स्थान प्राप्त होते.

माघ मासात प्रयागमध्ये स्नान, दान, भगवान विष्णूंचे पूजन करण्याचे विशेष महत्त्व सांगताना गोस्वामी तुलसीदास यांनी श्रीरामचरितमानसमध्ये लिहिले आहे की....

माघ मकरगत रबि जब होई। तीरतपतिहिं आव सब कोई।।
देव दनुज किन्नर नर श्रेनीं। सादर मज्जहिं सकल त्रिबेनीं।।
पूजहिं माधव पद जलजाता। परसि अखय बटु हरषहिं गाता।

पद्मपुराणातील उत्तरखंडमध्ये माघ मासाचे माहात्म्य वर्णन करताना लिहिण्यात आले आहे की...

व्रतैर्दानैस्तपोभिश्च न तथा प्रीयते हरि:।
माघमज्जनमात्रेण यथा प्रीणाति केशव:।।
प्रीतये वासुदेवस्य सर्वपापापनुक्तये।
माघस्नानं प्रकुर्वीत स्वर्ग लाभाय मानव:।।

अर्थ - व्रत, दान आणि तपश्चर्या करूनही भगवान विष्णूला तेवढा आनंद होत नाही जेव्हा माघ मासात पवित्र नदीमध्ये स्नान केल्याने होतो. यामुळे स्वर्ग लाभ, सर्व पापातून मुक्तीसाठी आणि भगवान विष्णूची कृपा प्राप्त करण्यासाठी प्रत्येक मनुष्याने माघ स्नान अवश्य करावे.

माघ मासाशी संबंधित इतर रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...