आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ भारतात नव्हे जगभरात सापडतात गुप्त काळापासून गणेश पूजेचे पुरावे....

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व रूपांत आणि सर्वत्र आढळणारी गणपती हा एकमेव देव आहे. २९ ऑगस्ट रोजी साज-या होणा-या गणेश चतुर्थीनिमित्त विविध देशांमध्ये आढळणारी गणपतीच्या रूपांची संक्षिप्त माहिती...
शेकडो वैशिष्ट्यपूर्ण रूपे असलेला गणपती पंथोपपंथांमध्ये अत्यंत लोकप्रिय, तर मुलांचा लाडका आणि आवडता देव आहे.
दशदिशांत आनंदाची उधळण करणारा देवांचा सेनापती, दीनदुबळ्यांचा सांगाती, साहित्याचा ज्ञाता, कलेचा उद्गाता, भक्तांचा तो रक्षणकर्ता आहे. गुप्तकाळापासून गणेशपूजेचे पुरावे सापडतात. अवकाश संशोधक थोर ज्योतिषी वराहमिहीर यांनी बृहत्संहितेत गणपतीपूजनाचा उल्लेख केला आहे. भारताबाहेर अनेक देशांत गणपती विविध रूपांमध्ये पुजला जातो. तामिळनाडूत गणपतीला पिल्लयार अर्थात मुलांचा देव म्हणतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या, जगभरातील गणपतींची माहिती...