आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Holi Today: Know, Simple Method Of Worship And Auspicious Time

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होळी आज: जाणून घ्या पूजेचा सोपा विधी आणि शुभ मुहूर्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंदू संस्कृतीत दसरा-दिवाळी, राखी आणि होळी हे चार प्रमुख उत्सव आहेत. यंदा 26 मार्चला होलिकोत्सव साजरा होत आहे. हिंदू पंचांगानुसार चैत्र महिन्यापासून सुरू होणार्‍या वर्षाच्या सर्वात शेवटच्या फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला होळी साजरी केली जाते. चैत्रापासून सुरू होणार्‍या वर्षाच्या समारोपाचा हा उत्सव आहे. होळी हा दुर्गुणांचे दहन करण्याचा रंगांचा उत्सव आहे. वर्षाचा समारोप बहुरंगी जल्लोषाचा असेल, तर नव्या वर्षाचा प्रारंभही तसाच बहुरंगी जल्लोषमय असतो, असा संदेशच हा सण देतो. होळी साजरी करताना सर्व भेदाभेद गळून पडतात. हाच या उत्सवाचा संदेश आहे. पुराणांमध्ये या सणाच्या पार्श्वभूमीवर हिरण्यकश्यपू, त्याची बहीण होलिका आणि प्रल्हाद यांची कथा सांगितली जाते. स्वत:मधील दुगरुणांचे दहन करून सद्गुणांचा विकास करण्याचा संदेशच हा होलिकोत्सव देतो.