आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील 7 गरम पाण्याचे कुंड, मकर संक्रांतीला भक्त लावतात डुबकी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मकर संक्रांतीच्या शुभ दिवशी तीर्थस्थळ, नदी आणि ऐतिहासिक कुंडांमध्ये स्नान करण्याचे धार्मिक महत्त्व आहे. या निमित्ताने divyamarathi.com वाचकांना खास सात कुंडांची माहिती देत आहे. मकरसंक्रांतीला येथे हजारो भाविक स्नान करण्यासाठी येतात.
राजगीर येथील जलकुंड -
बिहार राज्यातील पाटणा शहराजवळील राजगीर क्षेत्र भारतातील सर्वात पवित्र स्थळांमधील एक स्थळ मानले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी अनेक लोक येथे डुबकी लावण्यासाठी येतात. प्राचीन काळी हे स्थळ मगध साम्राज्याची राजधानी होती. प्राचीन कथेनुसार ब्रह्मदेवाचे मानस पुत्र राजा वसुने राजगीर येथील ब्रह्मकुंड परिसरात एका यज्ञाचे आयोजन केले होते. या यज्ञासाठी आलेल्या सर्व देवी-देवतांना एकाच कुंडामध्ये स्नान केल्यामुळे त्रास होऊ लागला. तेव्हा ब्रह्मदेवाने या ठिकाणी 22 कुंड आणि 52 जलधारांचे निर्माण केले. वैभारगिरी पर्वत रांगांमधील मंदिरांमध्ये गरम पाण्याचे अनेक झरे असून यामध्ये सप्तकर्णी गुहांमधून पाणी येते. याठिकाणी तुम्ही 22 कुंडामध्ये स्नान करू शकता. या कुंडांची वेगवेगळी नावे असून यामध्ये ब्रह्मकुंड सर्वात महत्त्वपूर्ण आहे. याचे तापमान 45 डिग्री सेल्सियस राहते. यालाच पाताळगंगा असेही म्हटले जाते.

पुढे वाचा, भारतातील इतर गरम जलकुंडांची खास माहिती...