आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How Many Days Of Hell After Death The Soul Reaches, In What Way

मृत्युनंतर किती दिवसानंतर आत्मा पोहोचतो यमलोकात, काय घडते या मार्गात?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत्यू हे एक असे सत्य आहे, जे कोणीही खोटं ठरवू शकत नाही. हिंदू धर्मामध्ये मृत्यूनंतर स्वर्ग-नरक अशा दोन मान्यता आहेत. पुराणानुसार जो मनुष्य चांगले कर्म करतो त्याचे प्राणहरण करण्यासाठी देवदूत येतात आणि त्याला स्वर्गामध्ये घेऊन जातात. जो मनुष्य वाईट कर्म करतो त्याचे प्राणहरण करण्यासाठी यमदूत येतात आणि त्याला नरकात घेऊन जातात, परंतु त्यापूर्वी त्या जीवात्म्याला यमलोकात नेण्यात येते आणि त्याठिकाणी यमदेव जीवात्म्याच्या पापानुसार त्याला शिक्षा देतात.
मृत्युनंतर जीवात्मा यमलोकात कशा प्रकारे जातो याचे विस्तृत वर्णन गरुड पुराणामध्ये करण्यात आले आहे. गरुड पुराणामध्ये हे ही सांगण्यात आले आहे की, कशा प्रकारे मनुष्याचा प्राण निघतो आणि कशा पद्धतीने तो प्राण पिंडदान प्राप्त करून प्रेतरूप धारण करतो.

- गरुड पुराणानुसार, ज्या मनुष्याचा मृत्यू जवळ आला असतो त्याला बोलण्याची खूप इच्छा असली तरी तो बोलू शकत नाही. शेवटच्या समयी त्याच्यामध्ये दिव्यदृष्टी उत्पन्न होते आणि तो संपूर्ण संसाराला एकरूप समजू लागतो. त्याचे सर्व इंद्रिय नष्ट होतात आणि तो जड अवस्थेमध्ये जातो, म्हणजे हालचाल करण्यात असमर्थ होतो.
गरुड पुराणामधील रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...