अनेक लोक साधू-संतांना पाहून सहज म्हणून जातात की, यांना काय जगाशी घेण देन? साधू बनणे खूप साधेसोप काम आहे. परंतु वास्तवामध्ये साधू,संन्याशी होण्याचा मार्ग एवढा खडतर आहे की, चांगल्या चांगल्यांना घाम फुटेल. नागा साधू बनण्याची प्रक्रिया सोपी नाही. यांना कठोर नियम-कायदे आणि शिस्तीचे पालन करावे लागते. जुना आखाड्याचे महंत विजयगिरी महाराजांनी दिलेल्या माहितीनुसार नागा साधूंना लष्करातील सैन्याप्रमाणे तयार केले जाते.
सैन्याच्या ट्रेनिंगपेक्षा कठोर ट्रेनिंग नागा साधूंना दिली जाते. यांना धर्म रक्षक आणि योद्धा मानले जाते. एका सामान्य माणसापासून नागा साधू बनण्याचा मार्ग खूप कठीण असतो. नागा साधू बनण्यापूर्वी स्वतःचे पिंडदान करावे लागते. प्रत्येक आखाड्याची दीक्षा देण्याची पद्धत वेगवेगळी आहे. परंतु काही नियम-कायदे असेही आहेत जे प्रत्येक आखाड्याला पाळावे लागतात. जाणून घ्या, त्या नियमांची माहिती...
ब्रह्मचर्याचे पालन -
आखाड्यात प्रवेश मिळाल्यानंतर त्याची ब्रह्मचार्याची परीक्षा घेतली जाते. या प्रक्रियेत केवळ दैहिक ब्रह्मचर्यच नाही तर मानसिक नियंत्रणही पारखले जाते. अचानक कोणालाही दीक्षा दिली जात नाही. संबंधित व्यक्ती पूर्णपणे इच्छा आणि वासनेपासून मुक्त झाला आहे की नाही, याची खात्री केली जाते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या, नागा साधू बनण्यासाठी कोणते नियम अनिवार्य आहेत...