आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • How To Be Prosperous In Life, Know Formula Of Gita

सुख प्राप्‍तीसाठी काय कराल, जाणून घ्‍या भगवत गितेतील उपाय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईश्वरावर विश्वास ठेवणारे पूजा करण्‍यासाठी मंदिरात जातात. ईश्वराची कृपा प्राप्‍त करण्‍यासाठी नामस्‍मरण करतात. जे लोक ईश्वाराचे अस्तित्‍व मान्‍य करत नाहीत त्‍यांना नास्तिक म्‍हटले जाते. सनातन धर्मामध्‍ये जे लोक वेद-पुराणाचा विरोध करतात, अशा लोकांना नास्‍तीक म्‍हटले आहे. समजाता काही लोक असे असतात त्‍यांची ईश्वराव श्रद्धा असते. मात्र विविध कामाच्‍या व्‍यापामुळे त्‍यांना ईश्वराची पूजा करण्‍यासाठी वेळ मिळत नाही.
सर्व प्रयत्‍न करून, संपत्ती मिळवल्‍यानंतरही काही लोकांना पाहिजे ते सुख प्राप्‍त होत नाही. सुखी अयुष्‍यासाठी काय करायला हवे या प्रश्‍नाचे उत्‍तर त्‍यांना सापडत नाही. अशा परिस्थितीमध्‍ये काय करायला हवे याविषयी भगवत गितेमध्‍ये मार्गदर्शन करण्‍यात आले आहे. ईश्वराची भक्‍ती करण्‍याचा भगवतगितेमध्‍ये एक मार्ग सांगण्‍यात आला आहे. ज्‍यामुळे तुम्‍हाला मंदिरात जाण्‍याची किंवा पूजा करण्‍याची गरज पडणार नाही. काय आहे हा मार्ग याविषयी जाणून घ्‍या.
श्रीमद्भगद्गीता में उजागर है है कि-
“स्वकर्मणा तमभ्यर्च्य सिद्धिं विन्दति मानव:”
भगवतगितेमध्‍ये सांगीतलेल्‍या श्लोकाचा अर्थ-
व्‍यावहारीक जीवनात कार्य करताना व्‍यक्‍ती अनेक चुका करतो. अशा चुका वारंवार होत राहिल्‍या तर त्‍याचा मनात अपराधाची भावना निर्माण होते. अशा वेळी देवाची पूजा केली नाही तरी चालेल. मात्र अहंकार आणि मोह सोडून त्‍याने कर्तव्‍याचे पालन करायला हवे. जो व्‍यक्‍ती कृर्तव्‍याचे पालन करणे ही ईश्वराची भक्‍ती असल्‍याचे भगवत गितेमध्‍ये सांगितले आहे. भगवतगीतेमध्‍ये दिलेल्‍या सुत्रानुसार तुम्‍ही जे कार्य करता, ते कार्य प्रमाणीकपणे करा. श्रम हीच पूजा मानणा-या लोकांवर ईश्वराची कृपा असते. तुम्‍ही तुमचे कार्य प्रमाणीकपणे कले तर ईश्वराची पूजा केली नाही तरी चालेल असे भगवतगीतेमध्‍ये सांगितले आहे.