आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 8 वस्तूंचे दान केल्याने आयुष्यभर प्राप्त होतात शुभफळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दान केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते तसेच कळत-नकळतपणे आपल्या हातून घडलेल्या पाप कर्मांचे फळही नष्ट होते. शास्त्रामध्ये दानाचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. या पुण्य कर्मामुळे समाजात समानतेचा भाव कायम राहतो आणि गरजू व्यक्तीलासुद्धा जीवनासाठी आवश्यक असणार्‍या वस्तू प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, दानाशी संबंधित काही खास गोष्टी...

1. अन्न, पाणी, घोड़ा, गाय, वस्त्र, शय्या(चादर, गादी) छत्र आणि आसन या वस्तूंचे दान आयुष्यभर शुभफळ प्रदान करते. शास्त्रानुसार जेव्हा आत्मा देह त्याग करतो तेव्हा आत्म्याला जीवनात केलेल्या पाप आणि पुण्याचे फळ भोगावे लागते. पाप कर्मांचे भयानक फळ आत्म्याला मिळते. या आठ वस्तूंचे दान मृत्यूनंतरच्या या काष्टांनाही दूर करू शकते.

2. जो व्यक्ती पत्नी, पुत्र आणि कुटुंबाला दुःखी करून दान करतो, त्याला दान पुण्य प्राप्त होत नाही. दान सर्वांच्या प्रसन्नतेने दिले जाते.

3. गरजू वाय्क्तीच्या घरी जाऊन केलेले दान उत्तम असते. गरजू व्यक्तीला घरी बोलावून केलेले दान मध्यम असते.

4. जर एखादा व्यक्ती गायी, ब्राह्मण आणि रुग्णांना दान करत असेल तर त्याला दान करताना अडवू नये. असे करणारा व्यक्ती पापाचा भागीदार होतो.

5. तीळ, कुश, पाणी आणि तांदूळ या गोष्टी हातामध्ये देवून दान करावे. अन्यथा हे पाप दैत्यांना प्राप्त होते.
बातम्या आणखी आहेत...