आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन प्रथा : एखाद्याच्या मृत्युनंतरच का ऐकले जाते गरुड पुराण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जन्म आणि मृत्यू हे एक असे चक्र आहे, जे अविरत चालू राहते. ज्या व्यक्तीने जन्म घेतला त्याचा मृत्यू निश्चित आहे. जन्मापासून मृत्युपर्यंत आपल्याला विविध कार्य करावे लागतात. या कार्यासंबंधी ऋषीमुनी आणि विद्वानांनी विविध प्रथा, परंपरा तयार केल्या असून यांचे पालन करणे अनिवार्य मानले गेले आहे. जीवन जगताना तसेच मृत्युनंतर काही प्रथांचे पालन मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना करणे आवश्यक असते. याच प्रथांमधील एक प्रथा घरातील सदस्याचा मृत्यू झाल्यानंतर गरुड पुराण वाचण्याची, ऐकण्याची आहे. एखाद्या ब्राह्मणाकडून गरुड पुरण वाचून घेतले जाते आणि कुटुंबातील सदस्य याचे श्रवण करतात.
गरुड पुराणासंबंधी शास्त्रात मान्यता -
असे मानले जाते की, गरुड पुराणाचे श्रवण केल्यास मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते. गरुड पुरण तेरा दिवस वाचले जाते. शास्त्रानुसार मृत व्यक्तीचे सर्व विधी पूर्ण होईपर्यंत त्याचा आत्मा घरातच निवास करतो आणि तोही हे पुराण ऐकतो. गरुड पुराण ऐकण्याचे धार्मिक महत्त्व हेच आहे की, मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती आणि मोक्ष मिळावा.

पुढे जाणून घ्या, गरुड पुराणाशी संबंधित इतर काही खास गोष्टी...