Home | Jeevan Mantra | Dharm | Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

13 डिसेंबर लक्ष्मीकृपा प्राप्त करण्याचा खास दिवस, 13 उपाय अवश्य करा

धर्म डेस्क | Update - Dec 11, 2013, 03:36 PM IST

लक्ष्मीकृपा प्राप्त करण्यासाठी या शुक्रवारी 13 डिसेंबरला एक खास तिथी आहे.

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  लक्ष्मीकृपा प्राप्त करण्यासाठी या शुक्रवारी 13 डिसेंबरला एक खास तिथी आहे. या तिथीला काही चमत्कारिक उपाय केल्यास त्याचे शुभफळ लवकर प्राप्त होते. पंचांगानुसार शुक्रवारी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील मोक्षदा एकादशी आहे. महाभारतातील युद्धामध्ये या तिथीला श्रीकृष्णाने अर्जुनाला गीता उपदेश केला होता. याच कारणामुळे या तिथीला गीता जयंती स्वरूपातही साजरे केले जाते. या अद्भुत योगातील ही तिथी खूप खास आहे.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, श्रीमद्भगवतगीतेशी संबंधित काही खास गोष्टी आणि लक्ष्मीकृपा प्राप्त करण्याचे उपाय...

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  जगातील कोणत्याही धर्म आणि संप्रदायामध्ये कोणत्याच ग्रंथाचा जन्मदिवस साजरा केला जात नाही. फक्त श्रीमद्भगवतगीतेची जयंती साजरी केली जाते, कारण इतर ग्रंथ एखाद्या मनुष्याने लिहिलेले किंवा संकलित केलेले आहेत. परंतु गीतेचा जन्म भगवान श्रीकृष्णाच्या श्रीमुखातून झाला आहे. श्रीकृष्ण भगवान विष्णूचे अवतार असून, जो भक्त या दिवशी श्रीकृष्ण, विष्णुदेव तसेच महालक्ष्मीची उपासना करतो त्याला सुख-समृद्धी, ऐश्वर्य प्राप्त होते. गीतेचा जन्म कुरुक्षेत्रामध्ये मार्गशीर्ष मासातील शुक्ल पक्षातील एकादशीला भगवान श्रीकृष्णाच्या श्रीमुखातून झाला.

  लक्ष्मीला प्रसन्न करण्याचे उपाय जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  या दिवशी एकादशीचे व्रत करावे. हे व्रत केल्यास अक्षय पुण्याची तसेच भगवान विष्णू आणि महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. या दिवशी फलाहार घ्यावा.
  व्रत करण्याची इच्छा असणार्‍या व्यक्तीने दशमी तिथीला म्हणजे गुरुवारपासून शुद्ध-सात्विक आहार घ्यावा. त्यानंतर एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर विष्णूदेवाची आणि लक्ष्मीची पूजा करावी. देवाला तुळशीचे पान अर्पण करावे. द्वादशी तिथीला म्हणजे शनिवारी सकाळी विष्णूदेवाची पूजा करावी, त्यानंतर गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करावे. सर्वात शेवटी स्वतः जेवण करावे.

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  या एकादशीच्या दिवशी लक्ष्मी आणि श्रीहरीची पूजा करावी. पूजेमध्ये शंख, मोती, कवड्या ठेवाव्यात, कारण या गोष्टी समुद्रातून उत्पन्न झालेल्या असून विष्णुदेवालाही प्रिय आहेत. पूजा झाल्यानंतर या वस्तू धनस्थानावर, तिजोरीत ठेवल्यास धनामध्ये वृद्धी होईल.

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  - या दिवशी लक्ष्मी-विष्णूची पूजा झाल्यानंतर मुख्य प्रवेशद्वारावर लक्ष्मीच्या पादुका लावाव्यात.
  - श्रीयंत्र, कनकधारा यंत्र, कुबेर यंत्र सिद्ध करून देवघरात किंवा तिजोरीत स्थापन करावे.

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  - लक्ष्मी पुजेसोबतच ५१ कवड्यांची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर या कवड्या घरामध्ये ठेवणे सुभ, सुख-समृद्धीदायक मानले जाते.

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  - या दिवशी एकाक्षी नारळाची पूजा करावी. पूजा झाल्यानंतर हे नारळ दुकानात  ठेवल्यास व्यवसायात नुकसान, तोटा होणार नाही. सुख-समृद्धी प्राप्त होईल.

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  - एकादशीच्या दिवशी रात्री रामरक्षा स्तोत्राचे पाठ आणि अनुष्ठान केल्यास ऐश्वर्याची प्राप्ती होते.
  - संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून कमळाचे फुल अर्पण करावे आणि त्यानंतर खालील मंत्राचा जप करावा.
  मंत्र - ऊँ महालक्ष्मयै नम:

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  एकदशीच्या दिवशी सकाळी लवकर उठावे आणि तांब्याच्या कलशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये लाल मिरचीच्या बिया टाकाव्यात. या पाण्याने सूर्याला अर्घ्य द्यावे. या उपायाने पाहिजे त्या ठिकाणी ट्रान्स्फर आणि प्रमोशन मिळेल. हा उपाय नियमित करणे आवश्यक आहे.

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  - महादेवाच्या मंदिरात जाऊन दुध, जलाचा अभिषेक करावा. दिवा लावावा. या उपायने स्थायी लक्ष्मीची प्राप्ती होते.

 • Importance Of Geeta Jayanti 13 December 2013

  या दिवशी सकाळी लवकर उठून तुळशीच्या पानांचा हार तयार करून विष्णुदेव आणि लक्ष्मीला अर्पण करावा.

Trending