Home | Jeevan Mantra | Dharm | Importance Of Shankh

शंखाच्या या खास कामांमुळे वाढेल तुमचे वय आणि ताकद, प्राप्त होईल लक्ष्मी कृपा

दिव्य मराठी | Update - Nov 25, 2013, 02:46 PM IST

भारतात चालणारे कर्मकांड आणि परंपरा या पिढीजात चालत असतात. त्याला कोणते शास्त्रीय कारण आहे हे कोणी विचारण्याचे धाडस करत नाही.

 • Importance Of Shankh

  भारतात चालणारे कर्मकांड आणि परंपरा या पिढीजात चालत असतात. त्याला कोणते शास्त्रीय कारण आहे हे कोणी विचारण्याचे धाडस करत नाही. मात्र, आता या कर्मकांडांना आणि परंपरांना वैज्ञानिक आधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. ही गोष्ट पश्चिम भागातील विद्वानांनी आपल्या संशोधनातून स्पष्ट केली आहे. पूजा, यज्ञ तसेच अन्य काही विशिष्ट घटनांनंतर शंखनाद करणे ही आपली परंपरा आहे.

  1982मध्ये बर्लिन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी शंखध्वनीनंतर वातारणात काय बदल होतो यावर संशोधन केले आणि हे सिद्ध केले की, शंखनादानंतर हवेतील जिवाणू पळून जातात. शंखनाद करणे यामागे कारण हेच असते की यामुळे शरीर निरोगी होते. घरात शंख ठेवणे आणि त्याला वाजवण्याने वास्तुदोष दूर होतो. हा भारतीय संस्कृतीचा फार मोठा ठेवा आहे.

  शंखाचे आणखी काही खास फायदे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करा...

 • Importance Of Shankh

  शंखाची उत्पत्ती कशी झाली - आपल्या धर्मग्रंथानुसार शंखाची उत्पत्ती अशी - पृथ्वी आत्म्यामधून, आत्मा आकाशातून, आकाश वायूतून, वायू अग्नीतून, अग्नी पाण्यातून, पाणी पृथ्वीतून उत्पन्न झाले आहे. ही सर्व तत्त्वे मिळून शंखाची उत्पत्ती झाली आहे. शंख हा समुद्रातील एका प्राण्याचे कवच आहे. आपल्या सुरक्षेसाठी त्याने ते बनवलेले असते.

 • Importance Of Shankh

  शंख वाजवल्याने आरोग्य लाभते - शंख वाजवण्याने दृष्टी सुधारते. यात पूरक, कुंभक आणि रेचक अशा प्राणायामाच्या क्रिया एकाच वेळी होतात. श्वास सोडण्याच्या क्रियेने रेचक होते, हृदयरोग, रक्तदाब, श्वासाचे आजार, मंदाग्नी अशा विविध प्रकारच्या आजारांत शंख वाजवण्याने फायदा होतो. जर कोणाला बोलता येत नसेल किंवा कोणी बोलताना नेहमी अडखळत असेल शंख वाजवल्याने हे दोष दूर होतात. यामुळे फुफ्फुसांचे रोग दूर होतात. दमा, यकृत आणि इन्फ्ल्युएन्झा या रोगांवर शंखध्वनी फायदेशीर ठरतो. शंखोदक भस्मामुळे पोटाचे आजार, कावीळ अशा अनेक विकारांवर त्याचा वापर होतो.

 • Importance Of Shankh

  समुद्रमंथनात मिळालेले सहावे रत्न - समुद्रमंथनाच्या वेळी 14 रत्नांमध्ये सहावे रत्न शंख आहे. शंखनाद केल्यानंतर जो ध्वनी निर्माण होतो, त्यातून ‘अ उ म’ म्हणजे ‘ओम’ शब्दाचा उच्चार होतो. या उच्चाराने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते.

 • Importance Of Shankh

  देवतुल्य आहे शंख - ब्रह्मवैवर्त पुराणानुसार शंख चंद्र आणि सूर्याप्रमाणे देवस्वरूप असतो. याच्यामध्ये वरुण, पृष्ठभागात ब्रह्म आणि अग्रभागात गंगा व सरस्वती यांचा निवास आहे. शंखातून शिवलिंग, कृष्ण किंवा लक्ष्मी यांच्यावर पाणी किंवा पंचामृताचा अभिषेक केला जातो. यामुळे देव प्रसन्न होतात असे म्हणतात. पांचजन्य व विष्णू शंख दुकानात किंवा कार्यालयात, फॅक्टरीत ठेवल्याने व्यवसायात लाभ होतो.

 • Importance Of Shankh

  लहान मुलांच्या शरीरावर लहान लहान शंख बांधल्याने आणि शंखजल प्यायल्याने वाणीचा दोष दूर होतो.नेहमी शंख वाजवल्याने मुका माणूस आणि श्वासाचा रोगी बोलण्याची शक्ती मिळवू शकतो, असा उल्लेख पुराणात आढळतो.

 • Importance Of Shankh

  पापनाशक धर्माचे प्रतिक - शंखाला सनातन धर्माचे प्रतीक मानले जाते. हे निधीचे प्रतीक मानले जाते. शंखास पूजाघरात ठेवण्याने अरिष्ट तसेच अनिष्टांचा नाश होतो. शंखामुळे सौभाग्याची वृद्धी होते. स्वर्गलोकात अष्टसिद्धी तसेच नवनिधींमध्ये शंखाला विशेष महत्त्व आहे. शंखाचा स्पर्श झालेले जल गंगजळाएवढे पवित्र असते. शंखात पाणी भरून ‘ओम नमोनारायण’ असा उच्चर करून देवाला स्नान घातल्यास पापांचा नाश होतो. शंख आवाजाचे प्रतीक आहे. नाद जगात आदिपासून अंतापर्यंत व्यापलेला आहे. सृष्टीचा आरंभ नाद, ध्वनीने झाला आहे आणि त्याचा विलय पण त्यात होतो.

 • Importance Of Shankh

  विजयाच्या घोषणेचे प्रतीक - शंखाला विजयाच्या घोषणेचे प्रतीक मानले जाते. कार्याच्या प्रारंभी शंख वाजवणे शुभ मानले जाते. याचा ध्वनी ऐकल्याने ईश्वराच्या उपस्थितीचा अनुभव येतो.

  शंखाचे वैज्ञानिक संदर्भ - शंखध्वनीमुळे सूर्याची किरणे बाधित होतात. सकाळी आणि सायंकाळी शंखध्वनी करण्याने वातावरण बदलते.

 • Importance Of Shankh

  - शंखजल आरोग्य, हाडांसाठी, दातांसाठी लाभदायक असते. यात गंधक, फॉस्फरस, कॅल्शियम असते.
  - संगीतसम्राट तानसेन यांनी आपल्या सुरुवातीच्या काळात शंख वाजवून गायनाची शक्ती मिळवली होती.
  - अथर्ववेदानुसार शंखात राक्षसांना नाश करण्याची शक्ती असते.

 • Importance Of Shankh

  शंखाचे प्रकार - शंखाचे अनेक प्रकार असतात. मात्र, याचे वैशिष्ट्य आहे की पूजापद्धती वेगवेगळ्या आहेत. उच्चश्रेणीचे श्रेष्ठ शंख कैलास मानसरोवर, मालदीव, लक्षद्वीप, कोरामंडल द्वीपसमूह, श्रीलंका आणि भारत येथे सापडतात. दक्षिणावर्ती शंख उजव्या हातात पकडतात. मध्यावर्ती शंख ज्याचे तोंड मध्येच उघडले जाते, वामावर्ती शंख हा डाव्या हाताने पकडला जातो. याशिवाय लक्ष्मी शंख, गणेश शंख, गोमुखी शंख, कामधेनू शंख, विष्णू शंख, देवदत्त शंख, चक्र शंख, पौंड शंख, वीणा शंख, सुघोष शंख, गरुड शंख, मणिपुष्पक शंख, राक्षस शंख, शनी शंख, राहू शंख, केतू शंख, शेषनाग शंख, कच्छप शंख असतात. या शंखांच्या दुर्मिळतेमुळे आणि चमत्कारिक गुणांमुळे ते अधिक मौल्यवान असतात.

Trending