आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुंदरकांडशी संबंधित या गोष्टी फार कमी लोकांना माहिती असाव्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रामायणातील हनुमंताच्या यशाचा दाखला सुंदरकांडामध्ये मिळतो. श्रीरामचरितमानस ग्रंथातील पाचव्या अध्यायाची लोक नेहमी चर्चा करताना दिसतात. या अध्यायाचे नाव सुंदरकांड का ठेवण्यात आले हा प्रश्न सर्वाना पडतो. येथे जाणून घ्या, या प्रश्नांचे उत्तर...


श्रीरामचरितमानसमध्ये सात कांड...

श्रीरामचरितमानसमध्ये सात कांड (अध्याय) आहेत. सुंदरकांड व्यतिरिक्त सर्व अध्यायांची नावे स्थान किंवा स्थितीच्या आधारावर ठेवण्यात आली आहेत. बाललीलेचे बालकांड, अयोध्येच्या घटनांवरील अयोध्याकांड, जंगलातील जीवनाचा अरण्यकांड, किष्किंधा राज्यामुळे किष्किंधाकांड, लंकेच्या युद्धाची चर्चा करणारा लंकाकांड आणि जीवनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे देणारा उत्तरकांड.


सुंदरकांडचे नाव सुंदरकांड का ठेवण्यात आले?

हनुमान सीतेच्या शोधात लंकेत गेले होते आणि लंका त्रिकुटाचल पर्वतावर वसलेली होती. त्रिकुट पर्वत म्हणजे येथे तीन पर्वत होते. पहिला सुबल पर्वत, येथल मैदानात युद्ध झाले होते. दुसरा नील पर्वत, येथे राक्षसांचे महाल होते आणि तिसऱ्या पर्वताचे नाव सुंदर पर्वत होते. या पर्वतावर अशोक वाटिका होती. याच अशोक वाटिकेमध्ये हनुमान आणि देवी सीतेची भेट झाली होती. या कांडातील ही सर्वात महत्त्वाची घटना होती. यामुळे याचे नाव सुंदरकांड ठेवण्यात आले.

पुढे वाचा, सुंदरकांडचे पठण्‍ा केल्‍यानंतर काय लाभ होतो...
बातम्या आणखी आहेत...