आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैशाख मास सुरु, महिनाभर लक्षात ठेवा या खास गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू पंचांगानुसार शनिवार, 4 एप्रिलपासून वैशाख मास सुरु झाला आहे. हा मास 4 मेपर्यंत राहील. या महिन्यात भगवान विष्णूची विशेष रुपात पूजा केली जाते. या दिवसापासून वैशाख मास स्नानाला सुरुवात होते. स्कंद पुराणामध्ये वैशाख मासाला सर्व मासांमध्ये उत्तम मानण्यात आले आहे. वैशाख मासात जो व्यक्ती सूर्योदयापूर्वी स्नान करतो, व्रत ठेवतो त्याला भगवान विष्णूची विशेष कृपा प्राप्त होते. श्रीहरी कृपेने घरातील दरिद्रता दूर होऊ शकते. सर्व दुःखातून मुक्ती मिळते आणि अक्षय पुण्याची प्राप्ती होते. वैशाख मासाचे देवता भगवान मधुसूदन असून या मासात जल दानाचे विशेष महत्त्व आहे.

स्कंद पुराणातील उल्लेखानुसार महिरथ नावाच्या राजाने केवळ वैशाख स्नान करून वैकुंठधाम प्राप्त केले. या महिन्याचे व्रत करणाऱ्या व्यक्तीने दररोज सूर्योदयापूर्वी तीर्थ स्थळावर, तलाव, नदी किंवा घरातच स्नान करावे. घरात स्नान करताना पवित्र नद्यांचा उच्चार करावा. स्नान करून सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य द्यावे.

अर्घ्य देताना खालील मंत्राचा जप करावा -
वैशाखे मेषगे भानौ प्रात: स्नानपरायण:।
अध्यं तेहं प्रदास्यामि गृहाण मधुसूदन।।

पुढील स्लाईडवर जाणून घ्या, वैशाख मासात कोणते उपाय करावेत आणि वैशाख मासाशी सबंधित काही खास गोष्टी...