आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंदिरा एकादशी : हे व्रत केल्याने पितरांना प्राप्त होतो स्वर्ग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्म ग्रंथानुसार भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष एकादशीला इंदिरा एकादशी म्हणतात. या दिवशी शाळिग्रामाची पूजा करून व्रत केले जाते. हे व्रत केल्याने मनुष्य सर्व पापंमधून मुक्त होऊन वैकुंठ प्राप्त करतो आणि त्याच्या पितरांनाही स्वर्गात स्थान मिळते. या वर्षी ही एकादशी 19 सप्टेंबर शुक्रवारी आहे.

व्रत विधी
एकादशी तिथीच्या एक दिवस अगोदर दशमी तिथीला सकाळी उठून स्नान केल्यानंतर पुन्हा दुपारी नदी किंवा एखाद्या तालावर जाऊन स्नान करावे. त्यानंतर पितरांचे श्राद्ध करून एकदाच जेवण करावे. एकादशी तिथीला स्नान केल्यानंतर संकल्प करावा की, ' हे भगवान नारायण, आज मी सर्व भोगांचा त्याग करून निराहार राहून एकादशीचे व्रत करत आहे. मी आपणास शरण आलो आहे, तुम्ही माझे रक्षण करा.

संकल्प घेतल्यानंतर शाळिग्रामाच्या मूर्तीसमोर विधिव्रत श्राद्ध करून ब्राह्मणांना फलाहार, दक्षिणा देवून तृप्त करावे. पितरांना दिलेल्या पिंडाला गाईला खाऊ घालावे. त्यानंतर धूप-दीप, गंध, फुल, नैवेद्य अर्पण करून विष्णूची पूजा करावी. रात्री जागरण करावे. त्यानंतर द्वादशीला सकाळी पुन्हा भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा करून ब्राह्मणांना जेवू घालावे. त्यानंतर आपल्या कुटुंबीयांसह मौनाने जेवण करावे. अशा प्रकारे व्रत केल्याने पितरांना स्वर्गात स्थान मिळते.

इंदिरा एकादशी व्रताची कथा जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)