आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या शिवलिंगावर आपोआप पडते पाणी, नाग-नागीण भक्तांना देतात दर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर बायपासपासून बैतुल मार्गावर देवगुडिया पर्वतावर महादेवाचे एक हजार वर्षांपेक्षाही प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात पर्वताच्या पाण्याने महादेवाचा नैसर्गिक अभिषेक होतो. मंदिरात शिवलिंगाच्या वरील बाजूस असलेल्या नंदीच्या मुखातून श्रावण-भाद्रपद महिन्यात प्रत्येक वर्षी नैसर्गिकरीत्या पाणी येते. हे पाणी थेट शिवलिंगावर पडते आणि मंदिराच्या दरवाजातून बाहेर असलेल्या अमृतकुंडात जाते. ही प्रक्रिया एक दोन वर्षांपासून नाही तर प्राचीन काळापासून सुरु आहे.

मंदिराचे पुजारी ओमप्रकाश पुरी सांगतात की, सोळा पिढ्यांपासून त्यांचेच कुटुंब या मंदिराची पूजा करत आहे. आता सतरावी पिढीसुद्धा हे काम करत आहे. हे मंदिर हजारो वर्षांपेक्षाही जुने असल्याचे यांचे मत आहे. या मंदिराला स्थानिक लोक गरुड तीर्थ नावाने ओळखतात. मान्यतेनुसार, येथे भगवान गरुड यांनी कठोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले होते. त्यानंतर महादेव शिवलिंग रुपात येथेच थांबले. होळकर राजघराण्यातील अहिल्याबाई होळकर या शिवभक्त होत्या, त्यांनीच 18 व्या शतकात या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार केला.

मंदिरात पाच कुंड
मंदिरात पाच कुंड असून यामधील दोन कुंडांमध्ये भक्त स्नान करतात. या कुंडांमध्ये नेहमी पाणी राहते. प्राचीन मान्यतेनुसार या कुंडातील पाणी कधीही आटत नाही आणि संपूर्ण गावाची तहान हेच कुंड भागवते.
मंदिरात नागाची जोडी
या मंदिरामध्ये महादेवाचे गण मानली जाणारी नागांची एक जोडी आहे. कधी कुंडात तर काही मंदिरात हे नाग-नागीण भक्तांना दर्शन देतात. मान्यतेनुसार, ज्या भक्तांना यांचे दर्शन होते त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा या प्राचीन मंदिराचे निवडक फोटो....