आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात पहिल्यांचा असे अनोखे गणेश विसर्जन, यापुर्वी कधीही पाहिले नसेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदौर - येथील गांधी हॉल परिसरातील 10 दिवसांपासून भक्तांना ऊर्जा देत असलेल्या गणपतीचे अनोखे विसर्जन करण्यात येणार आहे. येथील गणपतीचा आपल्या जागेवरच जलाभिषेक करुन विसर्जन करण्यात आले. आता या मुर्तीच्या मातीचे दहा हजार सीड बॉल बनवण्यात येतील. या बॉलमधून निघणारे अंकुरण निसर्गासाठी उपयोगी पडतील. 

- मुर्तीचे सीड बॉल बनवण्याची देशातील ही पहिलीच वेळ आहे. 12 फूटांच्या या गणेष मुर्तीला गणेशोत्सवानंतर स्नान घालण्यात आले. सीड बॉलच्या या जापानी पध्दतीने निसर्गाला उपहार देण्यात येणार आहे. हे बॉल माती खत, बोरिक पाडवर, लाल मिर्ची आणि बीज मिसळून बनवले जातील.
 
नर्मदेला पांघरणार हिरवा शालू
ही कल्पना राबवणारे आणि वाइल्ड लाइफ फोटोग्राफर आलोक दुबे सांगतात की, हा बॉल एक वर्ष सुरक्षित राहतो. हे धरतीवेर जेथे फेकले तेथे पाऊस पडल्यावर झाडे उगवतात. यामध्ये अजून थोडीशी माती मिसळून 10 हजार बॉल तयार करण्यात येणार आहेत आणि नर्मदाच्या काढावर हिरवा शालू पांघरण्यात येईल. यामध्ये प्रामुख्याने गुलमोहर आणि चिंच यांचे बीज असतील.
 
नो वेस्ट पांडालमधून स्वच्छता मिशन
गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने यांना सर्वात मोठ्या अस्थायी पंडाल म्हणून सन्मानित केले आहे. परंतु हे कोणताच कचरा मागे ठेवून जाणार नाही. यामध्ये 30 हजार बांबू, 20 हजार मीटर रनिंग कपडा आणि दोन ट्रक थर्माकॉलचा वापर केलाय. आजोजकांनुसार बांबू आणि थर्माकॉल जेथून आणेल तेथे परत केले जातील. कपडा प्रसादाच्या रुपात गरीबांना देण्यात येईल. इंदौरला स्वच्छ बनवण्यासाठी हा प्रयो केला जाणार आहे. 
 
एमवायएचमध्ये गरीब खातात प्रसाद 
- इंदौरच्या राजाचा प्रसाद भक्तांमध्ये वाटला जात नाही. आयोजक मानतात की, भक्तांपेक्षा गरीब लोकांना या प्रसादाची जास्त गरज असते. यामुळे मोठे हॉस्पिटल म्हणजेच एमवायएचमध्ये गरीब रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना हे भोजन दिले जाते. 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...