आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनैच्श्रर जयंती: शनिदेवाला गंगाजलाने अभिषेक, दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या हस्ते महापूजा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शनिशिंगणापूर- आज शनैच्श्रर जयंती. शनीची महापूजा आणि उपाय करण्यासाठी हा दिवस म्हणजे एक स्वयंसिद्ध मुहूर्त मानला जातो. शनि जयंती निमित्ताने शनिशंगणापूरात आज पहाटेपासून सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. शनि जन्मोत्सवा निमित्ताने दूपारी बारा वाजता प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते महेश मांजरेकरांच्या हस्ते शनिदेवाची महाआरती करण्यात आली. ऑस्ट्रेलियातील शनिभक्त राकेश कुमार, झिम्बाब्वेतील शनिभक्त जयेश शहा याप्रसंगी चौथ-यावर आरतीसाठी उपस्थित होते. 

शनिजयंती निमित्ताने आज पहाटेपासूनच शनिभक्तंाची दर्शनरांगात गर्दी वाढत होती. शनिदेवाचा चौथरा व परिसरात शनिजयंतीमुळे फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. सकाळी ९ ते ११ यावेळेत श्री ज्ञानेश्वर तांबे महाराजांचे किर्तन झाले. त्यानंतर काशी व प्रवरासंगम येथून आणलेल्या गंगाजलाने सकाळी अकरा वाजता शनिदेवास जलाभिषेक करण्यात आला.जनकल्याण प्रित्यर्थ महायज्ञ सोहळाही पार पडला.

शनैच्श्रर जयंतीच्या निमित्ताने खास 'दिव्यमराठी'च्या वाचकांसाठी घरबसल्या शनी शिंगणापूर येथील महापूजेचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत.
 
500 वर्षांपूर्वीचा इतिहास
घर आहेत पण दारं नाहीत, तरीही येथे चोरी होत नाही अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या शनिशिंगणापूर देवस्थानालाही ५०० वर्षांपूर्वीचा इतिहास अाहे. पाचशे वर्षांपूवी वाहत आलेल्या या शिळेतूनच शनिदेव अवतीर्ण झाल्याचे सांगितले जाते. 

पुढील स्लाईड्सवर घ्या, शनि महापूजा, आरती दर्शनाचा लाभ...
व्यापारात मोठा फायदा आणि यशासाठी अवश्य करून पहा शनीचे हे खास उपाय
शनी जयंती : स्नानाच्या पाण्यामध्ये ही 1 गोष्ट मिसळून करावे स्नान, वाढेल उत्पन्न
शनिदेवावर यांनी केला होता प्रहार, यामुळे शनीची आहे मंद चाल
शनी जयंतीपूर्वी करा हा विशेष उपाय, अकाल मृत्यूचे भय होईल दूर
या कारणांमुळे शिंगणापूर आहे खास, सुर्यपुत्राला प्रसन्न करण्याची ही संधी सोडू नका
अशाप्रकारे जाणून घ्या तुमच्यावर कसा आहे शनीचा प्रभाव, पैसा मिळणार की नाही
वक्री शनीचा अशुभ प्रभाव दूर करण्यासाठी, आठवड्यातील वारानुसार करा हा 1 उपाय
या 5 राशींवर आहे शनीची दृष्टी, कसा राहील तुमच्यावर प्रभाव?
शनी जयंती : जुळून येत आहे शनी-मंगळ योग, असा राहील तुमच्या राशीवर प्रभाव
25 मे शनि जयंती : या आहेत शनि देवासंबंधीत 6 खास गोष्टी...
5 वस्तू : ज्यामुळे घरात येते गरिबी आणि आजारपण; शनिवारी चुकूनही आणू नयेत
सूर्य-शनीचा अशुभ योग, 15 जूनपर्यंत असा राहील12 राशींचा काळ
साडेसातीचा प्रभाव नष्ट करण्यास उपयुक्त आहेत हे9 दिवस, करा हे10 उपाय
कुंडली न पाहताही या संकेतांवरून जाणून घ्या, शनीची तुमच्यावर आहे वक्रदृष्टी
शनी जयंती 25 ला, राशीनुसार करा हे सोपे उपाय
चप्पल-बूट दान केल्याने होतो हा फायदा, या कारणामुळे दूर होते पनौती
बातम्या आणखी आहेत...