आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे महादेवाचे कुटुंब : जाणून घ्या, पत्नीपासून नातवंडांपर्यंत सर्वकाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या श्रावण मासाला सुरुवात झाली असून ग्रंथानुसार, या महिन्यात महादेवाची उपासना केल्याने विशेष फळ प्राप्त होते. शिवचा अर्थ आहे कल्याण करणारा. भगवान शिव आपल्या भक्तांवर लवकर प्रसन्न होऊन त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे देवता आहेत.

महादेव एका अर्थाने संपूर्ण कुटुंबाचे देवता आहेत, कारण हे एकमेव असे देवता आहेत ज्यांचे कुटुंब पूर्ण आहे. हिंदू धर्मामध्ये पूज्य असलेया 5 देवतांमधील तीन महादेवाच्या कुटुंबातील सदस्य आहेत. श्रावण महिन्याच्या या पवित्र निमित्ताने आम्ही तुम्हाला महादेवाच्या संपूर्ण कुटुंबाची माहिती देत आहोत.

भगवान शिव
महादेवाला सृष्टीचा प्राण मानले जाते. जर शिव नसते तर सृष्टी शव समान झाली असती. याच कारणामुळे महादेवाला काळांचा काळ म्हणजेच महाकाल मानले जाते. शिव प्राण देतात, जीवन देतात आणि संहारही करतात. महादेवाची पूजा सर्व सुख प्रदान करणारी मानली गेली आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये सहजपणे प्रसन्न होणाऱ्या देवतेची उपाधी महादेवाकडे आहे.

महादेवाच्या कुटुंबातील इतर सदस्यांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...