आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Interesting Facts About Ravana Brother Kumbhakarna

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रावणाचा भाऊ कुंभकर्ण याच्या या गोष्टी फार कमी लोकांना आहे माहित

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विभीषण आणि कुंभकर्ण असे रावणाचे दोन भाऊ होते, असे रामायणात सांगितले आहे. ब्रह्माजींना प्रसन्न करण्यासाठी या तीन भावांनी कठोर तपस्या केली होती. तपस्येनंतर ब्रह्माजी प्रकट झाले. पण कुंभकर्णाला वरदान देण्यापूर्वी चिंतित होते.
याबाबत श्रीरामचरित मानसमध्ये लिहिले आहे की-

पुनि प्रभु कुंभकरन पहिं गयऊ। तेहि बिलोकि मन बिसमय भयऊ।।
याचा अर्थ असा होतो, की रावणाला वरदान दिल्यानंतर ब्रह्माजी कुंभकर्णाजवळ गेले. पण त्याला वरदान देण्यावरुन चिंतीत होते. त्याचा देह बघून आश्चर्यचकित झाले होते.
जौं एहिं खल नित करब अहारू। होइहि सब उजारि संसारू।।
सारद प्रेरि तासु मति फेरी। मागेसि नीद मास षट केरी।।
कुंभकर्णाला भोजनासाठी अनेक पदार्थ लागायचे. दररोज जर तो भरपेट खात राहिला तर सृष्टी नष्ट होऊ शकते, असे ब्रह्माजींना वाटले. ब्रह्माजींनी सरस्वती देवीशी संपर्क साधून त्याची बुद्धी भ्रमित केली. त्यामुळे त्याने सहा महिने झोपण्याचे वरदान मागितले. ब्रह्माजींनी लगेच तथास्तू म्हटले.
पुढील स्लाईडवर वाचा, कुंभकर्णाशी संबंधित रोचक फॅक्ट्स....