आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे बाळकृष्णाचा हात हातात घेऊन नवस करतात भाविक; नाराज होऊन बनले होते पाषाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मथुरा- कृष्णजन्‍माष्‍टमीनिमित्त लाखों भाविक मथुरा आणि वृंदावनमध्ये पोहोचले आहेत. वृंंदावनमधील वंशी वटवृक्षाचे दर्शन घेण्यासाठी भाविक आज ब्रज भूमित मोठ्या संख्येने गर्दी करतात. मथुरेत अजूनही श्रीकृष्‍ण असल्याचा अनुभव घेतात. वटवृक्षाखाली बाळकृष्‍णाचा हात हातात घेऊन नवस मानतात. हा हात पाषाणाचा आहे.

आज आम्ही आपल्याला मथुरेतील वटवृक्षाविषयी काही इंट्रेस्टिंग फॅक्टस सांगणार आहोत...

माता यशोदावर नाराज होऊन श्रीकृष्ण बनले होते पाषाण
- महंत बाबा रासकुंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकदा बाळकृष्णाने मित्रांसोबत माखन चोरले. त्याच्यावर ताव मारून सगळेे वटवृक्षावर बसले. बाळकृष्ण बासरी वाजवण्यात दंंग असताना तिथे माता यशोदा पोहोचली. तिने बाळकृष्णाला रागावले.
- 'आपल्या घरी इतक्या गायी असताना दुसर्‍यांच्या घरातून माखन चोरी का करतोस?' असे यशोदेने विचारले असता बाळकृष्ण म्हणाले, 'हे मी स्वत:साठी नाही तर मित्रांसाठी करतो.'
- त्यावर यशोदा म्हणाल्या, 'थांब तुला आता शिक्षा देते.'
- माता यशोदेचे अहंकारी वक्तव्य ऐकून बाळकृष्ण वटवृक्षावरून गृप्त झाले. नंतर यशोदेला आपली चूक लक्षात आली. ती कृष्णाची विनवणी करू लागली. नंतर कृष्ण प्रकट झाले आणि त्याने मातेच्या खांद्यावर हात ठेवला.

बाळकृष्णाचा हात हातात घेतात भाविक....
- वटवृक्षाच्या खाली गोवर्धनाची शिला ठेवली आहे. वृक्षातून एक हात बाहेर आला आहे. हात बाळकृष्णाचा असून तो पाषाणाचा आहे.
- भाविका हा हात आपल्या हातात घेतात आणि श्रीकृष्‍णला नवस करतात.
- पंडित हरी किशन गोस्वामी यांनी सांगितले की, श्रीकृष्ण नगरी वृंदावनमधील कणा-कणात परमेश्वर सामावला आहे.
- वटवृक्षाखाली आजही अनेक भाविक कृष्णाच्या बासरीची धूून ऐकल्याचे सांगतात.
- 5500 वर्षांपूर्वी कृष्ण गवळ्यांसोबत गायी चारण्यासाठी येत व वटवृक्षावर बसून बासरी वाजवत.

पुढील स्‍लाइडवर पाहा, वृंदावनमधील वटवृक्ष आणि मंदिराचे इतर फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...