आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 December Mountain Day: Bhutan Tiger Nest Monastery

हजारो फुट उंच पर्वतावरील हे अद्भुत मंदिर आहे शेकडो वर्ष जुने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दुरूनच दिसतो भुतानचा टायगर नेस्ट मठ)
आज (11 डिसेंबर, गुरुवार) इंटरनॅशनल माउंटन डे साजरा केला जातो. या निमित्ताने जाणून घ्या, भारताच्या शेजारील देश भुतानमध्ये हजारो फुट उंचीच्या पर्वतावर स्थित असलेल्या बौद्ध मठाशी संबंधित माहिती आणि पाहा शानदार फोटो...

3000 फुट उंच पर्वतावर स्थित आहे टायगर नेस्ट मठ
टायगर नेस्ट मठ (पारो घाटी) भूतानमधील सर्वात पवित्र आणि अद्भुत बौद्ध ठिकाणांमधील एक आहे. हा मठ 3000 फुट उंच पर्वतावर बांधण्यात आला आहे. 1692 मध्ये या मठाची उभारणी करण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर 1998 मध्ये याचा जिर्णोधार करण्यात आला. भुतानची राजधानी थिंपूपासून काही तासांच्या अंतरावर हा मठ स्थित आहे. हे बौद्ध भिक्षूंचे वास्तव्याचे विशेष ठिकाण असून यांचा दैनंदिन उपक्रम येथे जवळून पाहण्यास मिळतो.

या मठाच्या संपूर्ण परिसरात भुतानची अद्भुत कला पाहण्यास मिळते. पारो घाटीला टायगर नेस्ट मठ किंवा ताक्तशांग मॉनेस्ट्री हाइक नावानेही ओळखले जाते. हा मठ दुरून पाहिल्यास असे वाटते की, पर्वताच्या एका टोकावर या मठाला दोरखंडात बांधून लटकवले आहे. या उंच धार्मिक स्थळावर पोहोचण्यासाठी पगडंडीनुमा रस्ता आहे. या रस्त्यावरून पायी चालत मठापर्यंत पोहोचावे लागते.
हिमालयावर वसलेले आहे भुतान
भुतान हिमालयावर वसलेला दक्षिण आशियातील एक छोटा आणि महत्त्वाचा देश आहे. हा भारताचा शेजारी देश आहे. भुतान मुख्यतः पर्वतीय प्रदेश असून केवळ दक्षिण भागात थोडी समतल जमीन आहे. हा देश सांस्कृतिक आणि धार्मिक रूपाने तिबेटशी निगडीत आहे. या देशाची बरीच लोकसंख्या छोट्या गावांमध्ये असून शेतीवर निर्भर आहे. या देशात शहरीकरण हळू-हळू होत आहे.

पुढे पाहा या अद्भुत मठाचे शानदार फोटो...