आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीकृष्ण जन्माष्टमी : अशा पद्धतीने करा व्रत आणि श्रीकृष्णाची पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
17 ऑगस्ट 2014 रविवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे. धर्म शास्त्रानुसार द्वापारयुगात आजच्या दिवशी भगवान विष्णूने श्रीकृष्ण स्वरुपात जन्म घेतला. या दिवशी विशेष व्रत केल्यास मोक्ष प्राप्ती होते असे मानले जाते.

व्रत व पूजन विधी -
जन्माष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्यकर्म झाल्यानंतर स्नान करून पांढरे वस्त्र परिधान करा. त्यानंतर देवी-देवतांना नमस्कार करून पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी व्रताचा संकल्प घ्या. ( ज्या प्रकारचे व्रत करण्याची इच्छा आहे असा संकल्प घ्या. फलाहार किंवा एक वेळचे जेवण असे व्रत करावयाचे असल्यास तसा संकल्प करा.)

त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि माता देवकीची सोने, चांदी, तांब, पितळ, मातीच्या मूर्ती किंवा चित्र पाळण्यात स्थापित करा. श्रीकृष्णाला नवीन वस्त्र अर्पण करा. पाळणा हारफुलांनी सजवा. त्यानंतर श्रीकृष्णाचे पूजन करा. पूजेमध्ये देवकी, वासुदेव, बलदेव, नंद, यशोदा आणि लक्ष्मीच्या नावाचा उच्चार करावा. भगवान श्रीकृष्णाला पुष्पांजली अर्पित करावी.

मध्यरात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करावा. सुस्वर आवाजात पाळणा हलवून गाणे म्हणावे. पंचामृतामध्ये तुळशीचे पान टाकून आणि पंचखाद्याचा नैवेद्य दाखवावा. दुसर्या दिवशी नवमीला व्रताचा संकल्प सोडावा.