आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्माष्टमीला शुभ योग : या विधीनुसार करा पूजा, हे आहेत शुभ मुहूर्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उद्या (15 ऑगस्ट, मंगळवार) श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्ण निमित्त व्रत ठेवून विशेष पूजन केले जाते. जो भक्त सर्व नियमांचे पालन करून व्रत पूर्ण करतो त्याला मोक्ष प्राप्ती तसेच तो मोह-मायेच्या बंधनातून मुक्त होतो. हे व्रत एखाद्या इच्छापूर्तीसाठी केले तर ती इच्छा लवकर पूर्ण होऊ शकते.

जन्माष्टमीला सर्वार्थसिद्धी योग
उज्जैनचे पंचांगकर्ता आणि ज्योतिषाचार्य पं.श्यामनारायण व्यास यांच्यानुसार, यावर्षी जन्माष्टमीला सर्वार्थसिद्धी योग जुळून येत आहे. हा योग सकाळी 6 वाजून 7 मिनिटांनी सुरु होईल आणि रात्री 2 वाजून 30 मिनिटांपर्यंत राहील. या योगामुळे मंगळवारी खरेदी करणे शुभ राहील. कृतिका नक्षत्र आणि मंगळ संयोगामुळे बाजारातून दागिने, भांडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी श्रेष्ठ राहील.

शुभ मुहूर्त
सकाळी 10:30 ते 12 पर्यंत – लाभ
दुपारी १२ ते 01:30 पर्यंत – अमृत
दुपारी 3 ते 04:30 पर्यंत – शुभ
संध्याकाळी 07:30 ते रात्री 9 पर्यंत – लाभ
मध्यरात्री 12:10 ते 12:40 पर्यंत 

भगवान श्रीकृष्ण पूजेचा विधी, आरती, स्तुती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...