आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साधकाला सदगुरुंचा अनुग्रह

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परमार्थाच्या क्षेत्रात सद्गुरूंनी शिष्याला किंवा साधकाला अनुग्रह देण्याची प्रथा आहे. या प्रथेचे प्रत्यक्षात दोन प्रकार आहेत. अनुग्रहाचा एक प्रकार केवळ विधी म्हणून आहे, तर दुसरा प्रकार कैवल्यसिद्धी देणारा आहे. केवळ विधी म्हणून अनुग्रहाचा प्रकार आहे, त्या प्रकारात सद्गुरू शिष्याला संप्रदायाची दीक्षा देतात व साधकाला संप्रदायात सामील करून घेतात.
या प्रकारात गुरू-शिष्य संबंध जोडणे व साधकाला परमार्थाच्या क्षेत्रातील विशिष्ट प्रकारचे प्राथमिक मार्गदर्शन करणे इतकेच अभिप्रेत असते. हा अनुग्रह झाल्यावर व साधकाची जिज्ञासा व अभ्यास करण्याची तत्परता व सद्गुरुनिष्ठा लक्षात घेऊन सद्गुरू शिष्याला साधनेचे टप्प्याटप्प्याने धडे शिकवत दिव्य साधनेपर्यंत नेतात. सद्गुरूंनी प्रदान केलेल्या दिव्यबोधाच्या अधिष्ठानावर दिव्यसाधनेचा अभ्यास करणारा सत्साधक देवाच्या दिव्य स्मरणात रमून गेलेला साधक परेच्या पलीकडच्या प्रांतात प्रवेश करतो. परंतु, मायेच्या विलक्षण प्रतापामुळे हा साधक दिव्य स्वरूपाच्या प्रांतात स्थिर होण्यापूर्वीच जिवाचा म्हणजे परेच्या अलीकडच्या प्रांतात ढकलला जातो. या अवस्थेत सद्गुरूंच्या दिव्य मार्गदर्शनाची अत्यंत गरज असते.