आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईश्वर प्रदत्त संकेत म्हणजे अंतरात्म्याचाच अावाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या सर्वांना वेळोवेळी अशा कित्येक अनुभूती होतात, ज्या आपल्याला काही क्षण विचार करायला भाग पाडतात की, ‘असे कसे झाले? म्हणजे कित्येक वेळा आपण मनाची इच्छा नसतानाही रस्ता बदलतो वा कित्येक वेळा आपल्याला अंतर्मनात असे प्रतित होते की, आज काही अकल्पित होणार आहे. हे सर्व काय आहे? याला केवळ एक योगायोग म्हणता येणार नाही, तर मग काय म्हणावे याला? साधारण भाषेत याला ‘अंतरात्म्याचा आवाज’ म्हणतात. साधू आणि संतांचे असे मानणे आहे की, हा आवाज आपल्या सर्वांच्या अंतर्मनातून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतो. परंतु, अधिकतर लोक आवाजाच्या जगात वावरताना भौतिक जगाच्या प्रभावात त्या अंतःकरणातून येणारा आवाज ऐकू शकत नाही. मग आपण सदैव या प्रकारे अंतरात्म्यातून येणाऱ्या आवाजाकडे दुर्लक्ष करत राहणार आहोत का? असे काय करावे ज्यामुळे अंतरात्म्यातून येणाऱ्या त्या संकेतांना ध्यानस्थ होऊन स्वतःचे वा अन्य व्यक्तींना मार्गदर्शन करता येईल? ही प्रक्रिया सुरू करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजे संपूर्ण दिवसभरात आपल्या स्वाभाविक बुद्धीचे परीक्षण करणे. जसे रोज आपण ज्या रस्त्याने अाॅफिसला जातो, त्या ऐवजी अन्य रस्त्याने जाऊन पाहावे. ज्यामुळे आपल्याला समस्यांचा सामना करावा लागू नये. समजा, खरेच जर असे घडले, तर त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. परंतु, काही कारणास्तव असे नाही घडले तर तुम्हाला त्याविषयी अधिक ज्ञान प्राप्त करण्याची संधी मिळेल. लक्षात असू द्या अंतरात्म्याचा आवाज ईश्वर प्रदत्त संकेत आहे. ज्यात आत्मा एक महत्त्वपूर्ण माध्यम आहे. अंतरात्म्याला पूर्णत: जागृत करण्यासाठी सर्वशक्तिमान परमात्म्याशी आपले अतूट संयोजन बनवून ठेवणे अनिवार्य आहे. अन्यथा मध्ये पडणारी विघ्ने पुन्हा आपणास आंतरिक रूपाने कमजोर करू शकेल. चला तर मग आपले सहावे इंद्रिय पुनर्जीवित करण्यासाठी आपल्या तर्कसंगत मनाला प्रशिक्षित करू या आणि कोणत्याही असुरक्षा वा अनिश्चिततेशिवाय आपले जीवन सुख-शांतीसह जगू या.
बातम्या आणखी आहेत...