Home | Jeevan Mantra | Dharm | Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

फक्त या एका कामामध्ये पत्नी करू शकते मनमानी, पतीच्या प्रत्येक आज्ञेचे पालन करणे आवश्यक

धर्म डेस्क | Update - Nov 19, 2013, 11:52 AM IST

हिंदू धर्म ग्रंथामध्ये बायकोला नवर्‍याची अर्धांगिनी मानले गेले आहे.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  हिंदू धर्म ग्रंथामध्ये बायकोला नवर्‍याची अर्धांगिनी मानले गेले आहे. स्वतः महादेवाने अर्धनारीश्वर स्वरुपात पत्नीच्या या रुपाला साकार केले आहे. पुराणांमध्ये पत्नी धर्माबद्दल विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. पत्नीसाठी एक मर्यादा ठरवलेली आहे.

  शिवमहापुरणातील रुद्रसंहितेमध्ये शिव-पार्वती विवाह प्रसंगात पतिव्रता स्त्रीसाठी काही महत्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी माता पार्वतीला एका ब्राह्मण पतिव्रता पत्नीने सांगितल्या आहेत. व्यवहारिक दृष्टीने वर्तमान काळात या गोष्टींचे अनुकरण करणे फार कठीण आहे.

  शिवमहापुराणानुसार पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीसोबत कसा व्यवहार करावा यासबंधी जाणून घ्या...

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  धर्मामध्ये तत्पर असणार्‍या स्त्रीने आपल्या पतीने जेवण केल्यानंतरच जेवण करावे. पती उठून उभा राहिल्यानंतर पत्नीने उभे राहावे. पती झोपल्यानंतर झोपावे आणि सकाळी पती झोपेतून उठण्यापूर्वी उठावे.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  पत्नीने श्रृंगार न करता पतीसमोर जाऊ नये. पती एखाद्या कामासाठी परदेशात जात असेल तर त्यावेळी श्रृंगार करू नये. पतिव्रता स्त्रीने पतीचे एकेरी नाव घेऊ नये.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  पतीने आवाज दिल्यानंतर लगेच त्यांच्याकडे जावे आणि सांगितलेल्या आज्ञेचे प्रसन्नतापूर्वक पालन करावे. पतिव्रता स्त्रीने घराच्या मुख्य दरवाजासमोर जास्त काळ उभे राहू नये.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  पतिव्रता स्त्रीने पतीच्या परवानगीशिवाय कोठेही जाऊ नये. पतीच्या परवानगीशिवाय व्रत-उपवास करू नये.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  शिवमहापुराणानुसार पतिव्रता स्त्रीने प्रसन्न मनाने घरातील सर्व कार्य करावेत. जास्त खर्च न करता कुटुंबाचे पालन-पोषण योग्य पद्धतीने करावे.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  रजोनिवृत्तिनंतर शुद्धतापूर्वक स्नान करून सर्वात पहिले आपल्या पतीचा चेहरा पाहावा. पती घरात नसेल तर सूर्यदेवाचे दर्शन घ्यावे.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  पती गंभीर आजाराने त्रस्त असेल तर पतिव्रता स्त्रीने त्याला सोडून जाऊ नये. सुख-दुःखामध्ये पत्नीने पतीला साथ द्यावी. आपल्या पतीच्या गुप्त गोष्टी पत्नीने इतर कोणत्याही व्यक्तीला सांगू नयेत.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  मैथुनकाळा व्यतिरिक्त इतर कोणत्याही वेळी पतीसमोर धृष्टता करू नये. पतिव्रता स्त्रीने पतीचे मन प्रसन्न राहील असे काम करावे. पतीच्या मनामध्ये संशय, राग निर्माण होईल असे कोणतेही काम करू नये.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  पती दीर्घायुषी होण्याची इच्छा ठेवणार्‍या स्त्रीने हळद, कुंकू, काजळ लावणे, मांगलिक आभूषण परिधान करणे, केसांची वेणी घालणे या सर्व गोष्टी कराव्यात.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  जर घरामध्ये एखाद्या वस्तूची आवश्यकता असल्यास अचानक त्याविषयी बोलू नये, पहिले आपल्या मधुर वाणीने पतीला प्रसन्न करावे. त्यानंतर त्या वस्तूबद्दल बोलावे.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  एखादी स्त्री आपल्या पतीचा द्वेष करत असेल तर अशा स्त्रीसोबत पतिव्रता स्त्रीने जवळीकता ठेवू नये.

 • Just This Work Wife Do Arbitrary, Must Consider Husband S Every Things

  जी स्त्री पती कामावरून घरी आल्यानंतर त्याला पाणी, अन्न देवून त्याची सेवा करते, मधुर वाणीने चर्चा करते अशी स्त्री तिन्ही लोक संतुष्ट करते.

Trending