आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jyts 81 Days Starting From Hanuman Jayanti These Measures Will Hanuman Appeared In The Dream!

हनुमान जयंतीविशेष: 81 दिवसांचे व्रत केल्‍यांनतर होईल बजरंगबलीचे दर्शन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्‍योतिषाशास्‍त्रानुसार, अनेक चमत्‍कारी उपाय सांगण्‍यात आले आहेत. हे उपाय केल्‍यांनतर ईश्वराची कृपा प्राप्‍त होते. आज हनुमान जयंतीच्या निमि‍त्ताने आम्‍ही आपल्‍याला अशा प्रकारच्‍या उपायाची माहिती देत आहोत. 81 दिवसांचा उपवास केल्‍यांनतर आपल्याला हनुमानचे दर्शन होते. मात्र, हा उपाय करताना तुमची हनुमानावर श्रद्धा असायला हवी. श्रद्धा न ठेवता हा उपाय केला तर हनुमानचे दर्शन होत नाही असे सांगण्‍यात आले आहे. विशेष म्हणजे यंदा हनुमान जयंती मंगळवारी आलेल्याचे उत्तम योग जुळून आला आहे. 81 दिवसांचा हा उपाय केल्‍यांनतर विशेष फळ देणार ठरेल, असे शास्‍त्रात सांगितले आहे.
उपाय-
हनुमान जयंतीच्या दिवशी अथवा ज्या महिन्‍यात हनुमान जयंती असेल त्या महिन्याती कोणत्‍याही मंगळवारी सकाळी लवकर उठून स्‍नान करा. स्‍वच्‍छ कपडे परिधान करून हनुमाना मुर्तिचा अभिषेक करावा.
पहिल्‍या दिवशी उडिद हनुमानाच्‍या माथ्‍यावर ठेऊन अकरा प्रदक्षिणा घालाव्या. आपल्या मनातील इच्‍छा हनुमानासमोर व्यक्त करावी. त्यानंतर हुनमानाच्या माथ्यावर ठेवलले उडीद सोबत घ्यावे.
दुस-या दिवशी याच पध्दतीने हनुमानाची पूजा करा. 41 दिवस हा प्रकार केल्‍यानंतर 42 व्‍या दिवशी एक एक उडीद कमी करावा. असे केल्‍यानंतर 81 व्‍या दिवशी एक उडीद शिल्लक राहिल.
81 व्‍या दिवशी हनुमान आपल्या स्‍वप्‍नात येतील व तुमच्‍या मनोकामना पूर्ण करतील, असे सांगितले आहे.
या पूजेसाठी वापरलेले उडीदच्‍या पूजा समाप्त झाल्यानंतर नदी अथवा विहिरीत अर्पण करावे..
हनुमान जयंतीनिमित्त जाणून घ्‍या आणखी काही उपाय...