Home | Jeevan Mantra | Dharm | Jyts Bilwa Patra Uses According To Shivpuran

महाशिवरात्रीला बेलाच्‍या पानाचे महत्त्‍व

दिव्‍य मराठी टीम | Update - Feb 27, 2014, 02:01 PM IST

जे लोक महादेवाचे भक्‍त आहेत, त्‍यांच्‍यासाठी गुरूवारी (27 फेब्रुवारी) विशेष योग आहे. या दिवशी महाशिवरात्र असल्‍यामुळे शिवशंकर भक्‍तांना लवकर प्रसंन्न होतात.

 • Jyts Bilwa Patra Uses According To Shivpuran
  जे लोक महादेवाचे भक्‍त आहेत, त्‍यांच्‍यासाठी गुरूवारी (27 फेब्रुवारी) विशेष योग आहे. या दिवशी महाशिवरात्र असल्‍यामुळे शिवशंकर भक्‍तांना लवकर प्रसंन्न होतात. महाशिवरात्रीला केलेल्‍या पूजेमुळे वर्षभर केलेल्‍या पूजेएवढे पुण्‍य व्‍यक्तिली प्राप्‍त होते असे शास्‍त्रामध्‍ये सांगण्‍यात आले आहे.
  शिवशंकराला आवडते बेलाचे पान-
  शास्‍त्रामध्‍ये शिवशंकराची पूजा करण्‍याच्‍या विविध पध्‍दती सांगण्‍यात आल्‍या आहेत. यामध्‍ये काही पध्‍दती आवघड आहेत, तर काही सोप्‍या. सोप्‍या पद्धतीपैकी ही एक पध्‍दत . एखादा व्‍यक्ति जर नियमितपणे शिवलिंगावर जल आपर्ण करत असेल, तर तो शिवशंकराच्‍या कृपादृष्‍टीस पात्र ठरतो. शिवशंकराला प्रसन्‍न करूण घेण्‍यासाठी आणखी एक सोपा उपाय,बेलाची पाने शिवलिंगावर अर्पण करणे. महादेवाची पुजा पूर्ण होण्‍यासाठी बेलाचे पान महत्‍वाचे असल्‍याचे शास्‍त्रात सांगितले आहे. भक्तिभावाने बेलाची पान आर्पण केले तर सर्व इच्‍छा पूर्ण होतात. पैशाची चणचण भासत नाही.
  पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या बेलाच्‍या पानाविषयी

 • Jyts Bilwa Patra Uses According To Shivpuran
  भरभराट होण्‍यासाठी करा ही पूजा 
   
  बेलाचे झाड महादेवाचे रूप असल्‍याचे शिवपुराणात सांगितले आहे. त्रिलोकामध्‍ये जेवढे 'पुण्‍य तिर्थ' आहेत ते सर्व बेलाच्‍या झाडात निवास करतात. जो व्‍यक्ति बेलाच्‍या झाडासमोर उभे राहूण महादेवाचे नामस्‍मरण करतो त्‍याला महादेवाचा अर्शिवाद मिळतो. कुंकु, सुगंधी फूल, प्रसाद घेऊन जो व्‍यक्ति बेलाच्‍या वृक्षाची करणा-याला लक्ष्‍मी प्राप्‍त होते.या वृक्षा समोर सांयकाळी दिवा लावला तर महादेवाची अर्शिवाद मिळतो. 
 • Jyts Bilwa Patra Uses According To Shivpuran
  महाशिवरात्रीला करा खीर आणि तुपाचा उपाय
   
  जे भक्त महाशिवरात्रीला खीर आणि तुपाचे दाण बेलाच्‍या वृक्षाजवळ उभे राहूण करतील त्‍यांची गरिबी नष्‍ट होईल असे शिवपूरानात सांगण्‍यात आले आहे. 
  महाशिवरात्रीला एखाद्या शिवभक्‍ताला अन्नदान केल्‍याने व्‍यक्तिच्‍या अर्थिक आडचणी दुर होतात. 
 • Jyts Bilwa Patra Uses According To Shivpuran
  बेलाचे पान तोडण्‍याचे नियम 
   
  महादेवाला बेलाचे पान अत्‍यंत प्रिय असल्‍यामुळे या पानाला विशेष्‍ा महत्‍व आहे. या वृक्षाचे पान तोडताना हे पान कोणत्‍या उद्देशासाठी तोडणार आहात हे फार महत्‍वाचे ठरते. बेलाचे पान तोडल्‍यानंतर त्‍या शिवलिंगावर आपर्ण करा, असे केल्‍यानंतर शिवशंकराची कृपा प्राप्‍त होईल.   

Trending