Home | Jeevan Mantra | Dharm | Jyts- Human Skull In The Food And Water They Drink, The Whole Truth Know.

मानवी कवटीतच भोजन का करतात हे लोक; जाणून घ्या, या संप्रदायाबाबत

धर्म डेस्क | Update - Jan 05, 2014, 03:09 PM IST

तुम्हाला कोणी माणसाच्या कवटीत जेवण वाढले, पाणी प्यायला दिले तर?

 • Jyts- Human Skull In The Food And Water They Drink, The Whole Truth Know.
  तुम्हाला कोणी माणसाच्या कवटीत जेवण वाढले, पाणी प्यायला दिले तर? जेवण तर दूरच तुम्ही क्षणात तेथून काढता पाय घ्याल. परंतु, कपालिक संप्रदायातील लोक मानवी कवटीतच जेवण करतात तसेच कवटीनेच पाणी पितात. कपालिक लोक हे कपाली देवाची उपासना करतात. कपाली म्हणजे माणसाच्या कवट्याची माळा गळ्यात घालणारा शिव. मानवाच्या कवटीत भोजन करत असलेल्या लोकांना कपालिक असे म्हटले जाते.
  कपालिक संप्रदायाबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...

 • Jyts- Human Skull In The Food And Water They Drink, The Whole Truth Know.
  हे कपाली साधू महाकाली, भैरव, चांडाली, चामुंडा, शिव किंवा त्रिपुरा या सारख्या देवी- देवतांची आराधना करतात. मुख्य कपालिक साधू त्यांच्या तंत्र- मंत्राने सहकारी साधुंची कामशक्ती, नैराश, अस्वस्थता कमी करून स्वत:ची साधना पूर्ण करतात. आजही अनेक मठात कपाली साधना केली जाते. परंतु, ही साधना करताना अत्यंत गोपनियताही पाळली जाते. 
   
  कोण आहेत हे कपालिक आणि काय आहे यांचा इतिहास? जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
 • Jyts- Human Skull In The Food And Water They Drink, The Whole Truth Know.
  इतिहास
  प्राचीन काळात वैभव आणि संपत्ती मिळवण्यासाठी साधूंनी कपाली साधना आत्मसात केली. काळाच्या ओघात हा मार्ग वैभव मिळविण्याचा एक विकृत मार्ग बनला. काही लोकांनी या साधनेचा चुकीचा वापर करत चक्र साधनेचा उपयोग करून पैसा मिळवला तर इतरांची कामशक्ती कमी करण्यासाठी केला. यामुळेच या साधनेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन वाइट बनला. यानंतर हे कपालिक साधू वेगवेगळे झाले आणि त्यांनी स्वतंत्र साधना सुरू केली. शंकराचार्यांनी या अनैतिक साधनेला विरोध केल्यानंतर या संप्रदायातील बरेचसे लोक नेपाळच्या सीमावर्ती भागात तर काही तिबेटमध्ये गेले. तिबेटमध्ये बुद्ध कापलिक साधनेच्या रूपात हा संप्रदाय आता टिकून राहिला आहे.
 • Jyts- Human Skull In The Food And Water They Drink, The Whole Truth Know.

  इतिहासकार सांगतात, याच साधनेतून जादूटोणा उदयास आला आहे. काळी जादू करून असे लोक सामान्य जनतेला चूना लावतात. असे असले तरी कपालिक साधनेला या संप्रदायात खूप महत्व आहे. कपालिक चक्रत मुख्य साधूला 'भैरव' तर साधवीला 'त्रिपुरसुंदरी' म्हणतात. कामशक्तीच्या विविध साधनांमुळे त्यांना  अपार शक्ती प्राप्त होते. मनाप्रमाने शारिरीक अवयवांवर नियंत्रण ठेवण्याची, कुठल्याही गोष्टीचा विनाश करणे, निर्मिती करणे या सारख्या अघोरी शक्ती या साधनातून मिळविल्या जातात. या कपालिक साधूंनचे मठ आजही जीर्ण अवस्थेत उत्तर- पूर्व राज्यात पाहायला मिळतात.

 • Jyts- Human Skull In The Food And Water They Drink, The Whole Truth Know.

  आगम प्रमाण्य, शिवपुराण, आगमपुराण आदी पुराणात हे तांत्रिक संप्रदाय वेगळेपण कसे आहेत ते सांगण्यात आहे. वाचस्पती मिश्रणात चार संप्रदायांचा उल्लेख आहे. श्रीहर्ष कवीने निषेधात समसिद्धानताचा उल्लेख केलेला आहे. हा समसिद्धांताचा म्हणजेच कापलिक संप्रदाय असल्याचा अंदाज आहे.

Trending