उद्‍धवस्त झाले होते / उद्‍धवस्त झाले होते हे धाम, महाशिवरात्रीच्‍या निमित्ताने केदारनाथचे प्राचीन महत्त्व

Feb 26,2014 02:17:00 PM IST
27 फेब्रुवारीला महाशिवरात्री असल्‍यामुळे या दिवसाला हिंदू धर्मात विशेष महत्त्‍व आहे. या दिवशी शिवमंदीरासमोर भक्‍तांची गर्दी पाहायला मिळते. माहाशिवरात्रीच्‍या दिवशी 12 ज्‍योतिर्लिंगांच्‍या पूजनास विशेष महत्त्‍व प्राप्‍त झाले आहे. 12 ज्‍योतिर्लिंगापैकी एक असलेले केदारनाथ हे धाम अतिप्राचीन आहे. केदारानाथचे मंदिर हे नैसर्गिक ठिकाणी आसल्‍यामुळे प्रत्‍येक भक्‍ताला आपण नंदनवनात आलो आहोत असा भास होतो. 2013 मध्‍ये ढगफुटीमुळे केदारनाथ क्षेत्र उद्‍धवस्त झाले. आलेल्‍या ढगफुटीमुळे हजारो भक्‍तांना आपले प्राण गमवावे लागले. मात्र आज परिस्थिती बदलली आहे. या मंदिरामध्‍ये भक्‍तांची गर्दी वाढत आहे.
नर-नारायण करायचे भगवान शिवची पूजा
शास्‍त्रानुसार केदारनाथ संदर्भात एक अख्‍यायीका सांगितली जाते. शिवपुराणातील कोटीरूद्र संहितेमध्‍ये बद्रीवनात विष्‍णुचा आवतार नर-नारायण्‍ा यांनी शिवलिंग तयार करूण भगवान शंकराची पूजा केली. यांची भक्‍ती पाहून भगवान शंकर प्रकट झाले, आणि त्‍यांनी नर-नारायणाला वरदान मागण्‍यास सांगितले. यावेळी नर-नारायणाने वरदान मागितले की, जगाच्‍या उद्धारासाठी तुम्‍ही इथेच राहावे, भगवान शंकराने आनंदीत होऊन राहण्‍याचे वरदान दिले व या क्षेत्राला 'केदार' क्षेत्र म्‍हणून ओळखले जाईल हे वचन दिले.
बारा ज्‍योतिर्लिंगापैकी पाचवे ज्‍योतिर्लिंग केदारनाथ
नर-नारायणाला वचन देते वेळी महादेवाने सांगितले, की केदारनाथच्‍या दर्शनाबरोबर जो कोणी नर- नारायणाचे दर्शन करले तो सर्व पापांपासून मुक्‍त होईल. जो कोणी नर-नारायणाचे दर्शन घेईल त्‍याला मृत्‍यूनंतर शिवलोकामध्‍ये स्‍थान मिळेल. हे वरदान दिल्‍यानंतर ज्‍योतीच्‍या रूपात नर-नारायणाने स्‍थापीत केलेल्‍या लिंगामध्‍ये महादेव समाविष्‍ट झाले. देशातील 12 ज्‍योतिर्लिंगांपैकी केदारनाथ हे पाचव्‍या स्‍थानावर आहे.
पुढील स्‍लाईडवर वाचा केदारनाथ धाम संदर्भातील काही महत्त्‍वाच्‍या गोष्‍टी....
केदारनाथ धाम केदारनाथ धाम हिमालायाच्या कुशीत वसलेले आहे. हिमालयात असल्यामुळे नेहमी इथले वातावरण प्रतिकुल असल्यामुळे काही काळ हे मंदिर भक्तांसाठी बंद ठेवण्यात येते. एप्रिल ते नोंव्हेबर या काळामध्ये भक्तांसाठी मंदिर खुले करण्यात येते. स्वयंभू शिवलिंग- स्वत: प्रकट झाल्यामुळे या शिवलिंगाला स्वयंभू शिवलिंग म्हणून ओळखले जाते. केदारनाथचे मंदिराचे बांधकाम पांडव वंशातील राजा जनमेजय याने सर्वात आगोदर केले आणि जिर्णोध्दार गुरू शंकराचार्य यांनी केला. उत्तराखंडमध्ये केदारनाथ धाम सोबत महादेवाचे बद्रीनाथ धाम आहे.कडा चढण्याची प्रथा- केदारनाथला दर्शनासाठी आलेल्या भक्तांनी या हिमालायातील उंच कडा चढून दर्शन घेणे ही एक परंपरा आहे. जो भक्त या डोंगराची कडा चढून केदारनाथासाह नर- नारायणाचे दर्शन घेईल त्याला मोक्ष प्राप्ती होईल असे शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे. केदारनाथची पूजा केल्यानंतर इथले जल प्राशन केल्यानंतर व्यक्तिला पापा पासून मुक्ती मिळते असे सांगितले आहे.हजारो वर्ष पुरातन मंदिर केदारनाथ मंदीर किती जुने आहे याची अधीकृत महिती आजपर्यंत उपलब्ध झालेली नाही. जी माहिती उपलब्ध आहे, त्यानुसार हे मंदिर पांडव वंशातील जनमेजय या राजाने हे मंदिर बांधले आहे. हे मंदिर एका उंच चबुत-यावर बांधण्यात आलेले आहे. या मंदिराच्या बाहेर महादेवाचा नंदी बसलेला पाहायला मिळतो. प्रदक्षणा घालण्यासाठी विशेष असे बांधकाम करण्यात आलेले आहे. केदारनाथची पूजा करण्यासाठीची पध्दत प्राचीन असून आज ही या पध्दतीनेच केदारनाथची पूजा केली जाते. प्रत्येक दिवशी संध्याकाळी केदारनाथला विशेष श्रृंगार केला जातो. पुढील स्लाईडवर पाहा केदारनाथची छायाचित्रे
X