Home | Jeevan Mantra | Dharm | Jyts Know The Astrological Measure For Friday 14 Feb 2014

14 फेब्रुवारी (शुक्रवार)ची संध्याकाळ आहे खूप खास, करा हा चमत्कारिक उपाय

दिव्‍य मराठी नेटवर्क | Update - Feb 13, 2014, 07:24 PM IST

जर तुम्‍हाला महालक्ष्‍मीचा अर्शिवाद हवा असेल तर, 14 फ्रेब्रुवारीला(शुक्रवारी) आलेला दूर्मिळ योग टाळू नका

 • Jyts Know The Astrological Measure For Friday 14 Feb 2014
  जर तुम्‍हाला महालक्ष्‍मीचा अर्शिवाद हवा असेल तर, 14 फ्रेब्रुवारीला(शुक्रवारी) आलेला दूर्मिळ योग टाळू नका. या योगामध्ये करण्यात आलेल्या उपायामुळे काही दिवसातच तुम्हाला चमत्कारिक फळ प्राप्त होईल. 14 फ्रेब्रुवारीला हिंदू पंचागानुसार माघ महिन्‍यातील पौर्णिमा आहे. या पौर्णिमेला माघी पौर्णिमा म्‍हणून आळखले जाते. ही पौर्णिमा शुक्रवारी आल्‍यामुळे महालक्ष्‍मीची कृपा प्राप्त होऊ शकते. शुक्रवार हा महालक्ष्‍मीच्‍या पूजेचा विशेष दिवस मनाला जातो.
  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या लक्ष्मी पूजेचा विशेष विधी.

 • Jyts Know The Astrological Measure For Friday 14 Feb 2014
  ही पूजा दोन भागामध्‍ये करण्‍यात येते. या पुजेमुळे महालक्ष्‍मीची कृपा प्राप्‍त होईल. महालक्ष्‍मी प्रसन्‍न झाल्‍यानंतर तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील.  
   
  महालक्ष्‍मी पुजेचे पहिले चरण- 
   
  शुक्रवारी पौर्णिमेला संध्याकाळी स्नान करून पवित्र व्हा. घरातील स्‍वच्‍छ आणि पवित्र जागेवर पुजेची मांडणी करा.  पुजेसाठी ताटामध्ये किंवा चौरंगावर कुंकवाने स्‍वातिक काढा.स्वस्तिक काढताना श्रीगणेशाचे स्‍मरण करा. त्यानंतर गहू किंवा तांदळाची रास मांडून त्यावर लाल कपडा टाका. महालक्ष्‍मीची प्रतिमा किंवा मूर्तीला पाणी, दूध, दह्याने अभिषेक केल्यानंतर लाल कपड्यावर मूर्तीची स्थापना करा.
 • Jyts Know The Astrological Measure For Friday 14 Feb 2014
  महालक्ष्‍मी पुजेचे दुसरे चरण- 
   
  महालक्ष्‍मीच्‍या प्रतिमेची स्‍थापना केल्‍यानंतर तांदूळ, पुष्‍प, प्रसाद आणि पूजन सामग्री प्रतिमेला आर्पण करा. देवीला लाल वस्त्र अर्पण करा. त्यानंतर लक्ष्मीच्या खालील मंत्राचा जप करा 
   
  महालक्ष्‍मीचा मंत्र- 
  - महालक्ष्मी च विद्महे, विष्णुपत्नी च धीमहि, तन्नौ लक्ष्मी: प्रचोदयात्।
  - ऊँ श्रीं श्रीं महालक्ष्म्यै श्रीं श्रीं ऊँ नम:।
   
  - या मंत्राचा कमीत कमी 108 वेळेस किंवा तुमच्‍या इच्‍छेनुसार जप करा. 
  - जप झाल्‍यानंतर आरती केल्‍यानंतर पुजा पूर्ण होईल. पुजा झाल्‍यानंतर कुटुंबातील सदस्यांना प्रसादाचे वाटप करा. अशाप्रकारे पूजा केल्‍यानंतर आर्थिक आडचणीवर नक्की मार्ग सापडेल. 
 • Jyts Know The Astrological Measure For Friday 14 Feb 2014
  येथे सांगण्यात आलेला पूजन विधी करणे तुम्हाला शक्‍य नसेल तर, कोणत्याही महालक्ष्‍मीच्‍या मंदीरात जाऊन पाच दिवे लाऊन लक्ष्‍मीची पूजा करा. हा उपाय केल्याने लक्ष्‍मीचा अर्शिवाद मिळेल.पौर्णिमेच्या रात्री एखाद्या मंदिरात तीन झाडू दान करा. हे दान गुप्त पद्धतीने करण्यात यावे.
   
  पुढील स्‍लाईडवर क्लिक करा आणि जाणून घ्‍या हनुमानाला प्रसन्न करण्याचा उपाय...
 • Jyts Know The Astrological Measure For Friday 14 Feb 2014
  पोर्णिमेच्‍या संध्‍याकाळी हनुमानाची पूजा केल्‍यानंतर आपल्‍या इच्‍छा पूर्ण होतात. हनुमानाला प्रसन्‍न करण्‍यासाठी एक नारळ घेऊन हनुमान मं‍दिरामध्‍ये जा. मंदिरात गेल्‍यानंतर हनुमानाच्‍या मुर्तिसमोर उभे राहूण हे नारळ स्वतःवरून सात वेळेस उतरवून घ्या. त्यांनतर नारळ फोडा.हा उपाय केल्याने तुमच्यावरील संकटे दूर होतील.
  - पौर्णिमेच्या संध्‍याकाळी हनुमानजीच्‍या समोर चौमुखी दिवा लावावा. 
  - हनुमान चाळीसा किंवा सुंदरकांडचे पाठ करा.

Trending