Home | Jeevan Mantra | Dharm | Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014

मकर संक्रांतीला भूतलावर येतात देव, प्रसन्न करण्यासाठी करा हे खास उपाय

धर्म डेस्क | Update - Jan 13, 2014, 07:05 PM IST

सालाबादाप्रमाणे 14 जानेवारीला मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो

 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014
  सालाबादाप्रमाणे 14 जानेवारीला मकर संक्रांती हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य या दिवशी मकर राशीत प्रवेश करत असल्याने या दिवसाला 'मकर संक्रांत' असे म्हटले जाते. याच दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि उत्तरायणाच्या काळात देव पृथ्वीवर येत असल्याचा उल्लेखही धर्मग्रंथात आहे. यामुळे भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
  मकर संक्रांतिच्या दिवशी स्नान, दान, जप-तप, पूजा-पाठ केल्याने विशेष लाभ होतात. या दिवशी केलेले दान हे शंभर पटीने अधिक पुण्य मिळवून देणारे असते.
  पुढील स्लाईडवर वाचा, मकर सक्रांतीबाबत काही खास गोष्टी...


  हे पण वाचा...
  मकरसंक्रांती उद्या : करा राशीनुसार दान, पूर्ण होतील सर्व इच्छा
  स्त्री असो किंवा पुरुष मकरसंक्रांती(14जानेवारी)ला करावीत ही 4 कामे
  14ला उगवत्या सूर्यासमोर या मंत्राचा उच्चार केल्यास पूर्ण होतील सर्व इच्छा

  जीवनात यश व उन्नतीसाठी संक्रांतीच्या दिवशी करा हा प्रभावी उपाय
  जीवनात गतीचे प्रतिक आहे उत्तरायण, पुराणांमध्ये सांगण्यात आले आहे 'देवदान'
  जाणून घ्या, मकरसंक्रांतीला गंगा स्नानाचे का विशेष महत्व आहे
  PICS : हे आहेत मकरसंक्रांतीचे 7 प्राचीन उपाय, सूर्यदेवाच्या कृपेने उजळेल नशीब

 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014
  मकर संक्रांतिच्या दिवशी सूर्याच्या एका राशीतून दुसर्‍या राशीत प्रवेश करतो. या क्रियेला 'अंधकारातून प्रकाशाकडे' वाटचाल होत असल्याचेही मानले जाते. या दिवशी दिवस मोठा असल्यामुळे सूर्य प्रकाश अधिक असतो. रात्र लहान असल्याने काळोख कमी वेळ असतो. सूर्य हा प्रकाशाचा अविरत स्त्रोत आहे. सूर्याच्या प्रकाशाने जगात नव चैतन्य भरते. त्यामुळे व्यवहारीक दृष्टीकोनातूनही मकर संक्रातीचे महत्व आहे.
   
  ज्योतिषशास्त्रानुसार, चतुर्थीला येणार्‍या मकर संक्रांतीला फार महत्व आहे. गुरू या दिवशी आद्र नश्रत्रात प्रवेश करतो. तसेच मंगळवारी सूर्य मकर राशीत प्रवेश करत असल्याने पूर्व भारतात मेघ गर्जनेसह पाऊस होणार असल्याचेही भाकीत वर्तवण्यात आले आहे. पर्वतीय भागात हिमवृष्टी होईल तर पठारावर थंडाची लाट येईल.
 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014

  खगोलशास्त्रानुसार, सूर्य कक्षा बदलून दक्षिणायणातून उत्तरायणात प्रवेश करतो. ज्या राशीत सूर्य परिवर्तन करतो त्याला संकमण किंवा संक्रांती म्हणतात. हिंदू धर्मग्रंथात स्नानाला संस्कार मानले जाते. तसेच दररोज स्नान करणे हे आरोग्याच्या दृष्टीनेही फायदेशीर आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य उत्तरायणात प्रवेश करत असल्याने उष्णता वाढते आणि उन्हाळा ऋतुला सुरुवात होते. त्यामुळे मकर संक्रातीला स्नाना खूप महत्त्व आहे.

 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014
  माघे मासि महादेव यो दद्यात् घृतकम्बलम्।
  स भुक्त्वा सकलान भोगान् अन्ते मोक्षं च विन्दति।।
  माघ मासे तिलान यस्तु ब्राहमणेभ्य: प्रयच्छति।
  सर्व सत्त्व समाकीर्णं नरकं स न पश्यति।।  (महाभारत अनुशासनपर्व)
  मकर संक्रांतीला पहाटे दिवशी स्नान करून भगवान विष्णूची पूजा करावी. विष्‍णूला पूष्प, अक्षदा, हळद कुंकू वाहावे. त्यानंतर विष्णु सहस्त्र नामाचा जप करावा. या दिवसात तूप, तीळ, गुळ आणि खिचडीला विशेष महत्त्व आहे. या वस्तूंचे दान केल्याने देव तुमच्यावर प्रसन्न होतो. पैशांची चणचण दूर होते. तसेच मृत्यु पश्चात मोक्ष प्राप्त होतो. 
 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014
  . मकर संक्रांतीला गंगा स्नानाला विशेष महत्त्व असते. गंगेच्या तिरावर दान करावे. प्रयागमध्ये मकर संक्रांतीला भरणारी यात्रा जगप्रसिद्ध आहे. याचे वर्णन तुलसीदास यांनी 'रामचारित्र मानस' या ग्रंथात पुढील प्रमाने केले आहे. 
   
  माघ मकर गत रवि जब होई। तीरथ पतिहिं आव सब कोइ।।
  देव दनुज किंनर नर श्रेनीं। सादर मज्जहिं सकल त्रिबेनी।।
  गंगा, यमुना आणि सरस्वती अशा तिन्ही नद्याचा संगम असणार्‍या प्रयागमध्ये सर्व देव रूप बदलून स्नानासाठी येतात. म्हणूनच मकर संक्रांतीच्या दिवशी प्रयागमध्ये स्नान करणे शंभर पुण्यकर्माच्या समान आहे. 
  मकर संक्रातीच्या काळात एक महिना अलाहाबादच्या (प्रयाग) संगमावर एक महिना यात्रा भरते. विशेष म्हणजे येथे बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो. तसेच प्रति  सहा वर्षांनी अर्ध कुंभमेळा भरतो.
 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014
  उत्तर भारतातील गंगा- यमुना नदीच्या तिरावर असणा-या गावांमध्येही अशाच प्रकारच्या यात्रा भरतात. गंगासागर येथे मकर संक्रतीला भरणारी यात्रा ही  भारतातील सगळ्यात मोठी यात्री मानली जाते.
   
  मकर संक्रांतीला गंगा नदी स्वर्गातून पृर्थ्वीवर आली आणि भागिरथ ऋषीच्या मागे ती कपिल मुनीच्या आश्रमात गेली. तसेच गंगा येथे अवतरली. पावन गंगाजलाने याच ठिकाणी राजा सागरची साठ हजार मुले शापातून मुक्त झाली होती. याचमुळे या स्थानाला गंगासागर म्हणून ओळखले जाते. अशी आख्यायिका आहे. 
 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014

  दक्षिण भारतातील बिहारमधील मदार येथे ही मकर संक्रांतीला यात्रा भरते. या दिवसापासून सूर्य तीळ तीळ मोठा होत जातो असे महाराष्ट्रात म्हटले जाते. या दिवशी तीळगूळ अथवा तिळाचे लाडू आप्तजनांना देऊन आनंद साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या दिवशी वेगवेगळ्या खेळांचेही आयोजन केल्या जाते. 

 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014

  पंजाब, जम्मू-काश्मिर आणि हिमाचल प्रदेश या राज्यात 'लोहरी' नावाने मकर संक्रांती साजरी केली जाते. एका प्राचीन कथेनुसार, याच दिवशी कंसाने लोहिता नावाच्या राक्षसीणला श्रीकृष्णाला मारण्यासाठी पाठवले होते. कृष्णाने खेळत खेळत या राक्षसनीला ठार केले म्हणुन या दिवशी लोहरी सण साजरा केला जातो. 

 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014

  राजस्थानातील महिला या दिवशी तिळाची चिकी बनवून, सासू- सासरे तसेच ज्येष्ठ व्यक्तींना देऊन त्यांचा आर्शीवाद घेतात. राजस्थान आणि हरियाणा राज्यात दाल-बाटी, चुरमा, खीर, पुरीचा नैवद्य देवाला अर्पण करतात. तसेच येथे विविध ठिकाणी कुस्तीचे आयोजन केले जाते. पतंग उडवण्याच्याही स्पर्धा काही रंगते. 

 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014

  दक्षिण भारतात या सणाला पोंगल म्हणतात. या दिवशी तांदूळ आणि दाळीची खिचडी बनवतात. नवीन तांदूळ, तीळ, मुगसह नव धान्याची पूजा केली जाते. यानंतर बैलांच्या शर्यती लावल्या जातात. तमिळनाडूमध्ये तमिळ पंचागानुसार, मकर संक्रांतीपासून नव वर्षाची सुरुवात होते. 

 • Jyts Know The Importance Of Makar Sankranti 14 January 2014
  या वर्षी विक्रम संवत् 2070 मध्ये पौष शुक्ला चतुर्दशी, मंगळवारी एक वाजून बारा मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. शास्त्रानुसार सूर्य जर दूपारी मकर राशीत प्रवेश करत असेल तर संक्रांतिची सुरवात सकाळी होते. 
  'यदा तु सूर्यास्तात्पूर्व संक्रान्ति र्मवति तदोभयगते पूर्वमेव पुण्यकाल: (कालमाधव)
  आसामध्ये माघ बिहु, तर दक्षिण भारतात 14 जानेवारीला मकर संक्रांति साजरी केली जाईल. 13 जानेवारीला  पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मि-कश्मिर, दिल्ली मध्ये लोहड़ी सन साजरा होईल.

Trending