आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळभैरव स्वरुपात दुष्टांना दंड देतात भगवान शिव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (14 नोव्हेंबर, शुक्रवार) काळभैरव अष्टमी आहे. धर्म शास्त्रानुसार याच दिवशी महादेवाने काळभैरव अवतार घेतला होता. शास्त्रानुसार महादेवाचे दोन स्वरूप सांगण्यात आले आहेत. एक स्वरुपात महादेव आपल्या भक्तांना अभय देतात आणि दुसऱ्या काळभैरव स्वरुपात दुष्टांना दंडित करतात.

उग्र आहे काळभैरवाचे स्वरूप
रुद्रमाळेने सुशोभित, ज्यांच्या डोळ्यांमधून अग्नीच्या ज्वाला निघतात, हातामध्ये कपाल आहे, जे अति उग्र आहेत अशा काळभैरवाला मी वंदन करतो. भगवान काळभैरवाच्या या वंदनात्मक प्रार्थनेतून त्यांच्या भयंकर आणि उग्र स्वरुपाची ओळख होते. महादेवाचे विश्वेश्वरस्वरूप अत्यंत सौम्य आणि शांत आहे. हे भक्तांना सुख, शांती आणि समृद्धी प्रदान करते.

तंत्रमंत्राचे ज्ञाता आहेत काळभैरव
भगवान भैरवनाथ तंत्रमंत्र विद्यांचे ज्ञाता आहेत. याच्या कृपेशिवाय तंत्र साधना पूर्ण होऊ शकत नाही. यांचे 52 रूप मानले जातात. यांची कृपा प्राप्त करून भक्त निर्भय आणि कष्टातून मुक्त होतो. भैरवनाथ आपल्या भक्तांचे सदैव रक्षण करतात. ते सृष्टीचे रचना, पालक आणि संहारक आहेत.