आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करा उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणार्‍या या देवीची पूजा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातव्या दिवशी या देवीचे पूजन केले जाते. कालरात्री देवीच्या शरीराचा रंग अंधार्‍या रात्रीप्रमाणे काळा, डोक्यावरील केस विखुरलेले आणि गळ्यात चमकणारी माळ आहे. म्हणून या देवीला कालरात्री म्हणतात. या देवीच्या श्वासातून अग्नीच्या ज्वाळा निघतात. या चतुर्भुज देवीचे वाहन गाढव. उजव्या एका हाताची अभय व दुसर्‍याची वरमुद्रा आहे. एका डाव्या हातात लोखंडाचा काटा व दुसर्‍या हातात तलवार आहे. उग्र स्वरूप असूनही शुभ फळ देणार्‍या या देवीला शुभंकरी म्हणतात. आपल्या कोणत्याही कार्याचे शुभ फळ मिळते, असे उपासनेचे फळ आहे.

आजचा नैवेद्य : गूळ.
याचे फळ : आकस्मिक संकटाचे निवारण.
कुमारिका पूजनाचे फळ : राज्यप्राप्ती.
अर्पणद्रव्य : षोडशोपचार पूजन.