आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kailash Mansarovar Yatra First Troop Came Back And Share Things

सूर्यप्रकाश पडताच सोनेरी दिसतो 'कैलास' तयार होते ॐ ची आकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैलास मानसरोवरचे नाव ऐकताच मनामध्ये श्रद्धा आणि भक्तीची भावना जागृत होते. या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग अत्यंत कठीण आहे, परंतु तरीही महादेवाच्या दर्शनासाठी प्रत्येक वर्षी हजारो भक्त या खडतर प्रवासाची भीती न बाळगता कैलास मानसरोवरची यात्रा करतात. 22 दिवसांच्या मानसरोवर यात्रेवरून नुकतेच परतलेले 5 यात्री श्रीगंगानगर येथील रहिवाशी असून त्यांनी त्यांचे अनुभव दिव्य मराठीच्या प्रतिनिधीसोबत शेअर केले.

बातमीमध्ये दाखवण्यात आलेला फोटो कोणत्याही प्रकारे इडिट केलेला नाही. हे सर्व फोटो अगदी वास्तविक आहेत. सूर्याची किरणे कैलास पर्वतावर पडताच हा पूर्णपणे सोनेरी दिसू लागतो. एवढेच नाही तर, कैलास मानसरोवर यात्रे दरम्यान तुम्हाला पर्वतावर बर्फापासून तयार झालेल्या साक्षात ॐ चे दर्शन होते.

कैलास मानसरोवराच्या यात्रेतील प्रत्येक पाऊल पुढे टाकल्यानंतर अनोख्या दिव्यत्वाची जाणीव होते. आपण एका वेगळ्याच जगात आलो आहोत असे वाटते. हे सर्व अनुभव मानसरोवरची यात्रा करून आलेल्या भाविकांचे आहेत.

पुढील स्लाईड्सवर वाचा, जुना मार्गच चांगला, नवीन मार्ग लांब असून तेथे ऑक्सिजनचीसुद्धा कमतरता...