Home | Jeevan Mantra | Dharm | Kaliyug Predictions That Actually Came True

5000 वर्षांपूर्वीच करण्यात आली होती ही भविष्यवाणी, कलियुगात घडणार हे

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 06, 2017, 09:00 AM IST

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, कलियुग म्हणजेच सध्याच्या काळात काय-काय घडणार

 • Kaliyug Predictions That Actually Came True
  तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, कलियुग म्हणजेच सध्याच्या काळात काय-काय घडणार यासंदर्भातील भविष्यवाणी भागवत पुराणात पूर्वीपासूनच करण्यात आली आहे. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत, कलियुगाशी संबंधित काही खास भविष्यवाणी...
 • Kaliyug Predictions That Actually Came True
  हिंदू धर्मामध्ये श्रीमद्भागवत पुराण सर्वात प्राचीन आणि महत्त्वाचा ग्रंथ मानण्यात आला आहे. या ग्रंथाची रचना जवळपास 5000 वर्षांपूर्वी झाली होती असे सांगण्यात येते. या पुराणामध्ये कलियुगाशी संबंधित विविध गोष्टी सांगण्यात आल्या आहेत.
 • Kaliyug Predictions That Actually Came True
  या युगामध्ये स्त्री आणि पुरुष लग्न न करता केवळ विभिन्न लिंग आकर्षणामुळे एकत्र राहतील. व्यपाराचे यश छळावर निर्भर राहील. कलियुगात ब्राह्मण केवळ एक दोरा गुंडाळून पंडित होण्याचा दावा करतील.
 • Kaliyug Predictions That Actually Came True
  धर्म, सत्यवाद, स्वच्छता, सहिष्णुता, दया, जीवनाचा काळ, शारीरिक शक्ती आणि स्मृती दिवसेंदिवस कमी होत जाईल.
 • Kaliyug Predictions That Actually Came True
  कलियुगात ज्या व्यक्तीकडे जेवढे धन असेल त्याला तेवढेच गुणी मानले जाईल आणि कायदा, न्याय केवळ एका शक्तीच्या आधारावर लागू होईल.
 • Kaliyug Predictions That Actually Came True
  जो व्यक्ती लाच देण्यास किंवा धन खर्च करण्यात असमर्थ असेल त्याला न्यायालयात न्याय मिळणार नाही. जो व्यक्ती स्वार्थी आणि चालाख असेल तोच बुद्धिमान मानला जाईल.
 • Kaliyug Predictions That Actually Came True
  लोक भुक, तहान, प्रेम आणि इतर विविध प्रकारच्या गोष्टींनी चिंताग्रस्त  राहतील. विविध प्रकारचे रोग नेहमी त्यांच्या अवतीभवती राहतील.
 • Kaliyug Predictions That Actually Came True
  लोक दूरच्या नदी-तलावाला तीर्थस्थळ मानतील परंतु स्वतःजवळ असलेल्या आई-वडिलांची निंदा करतील. डोक्यावर मोकळे केस सोडणे सौदंर्य मानले जाईल आणि केवळ पोट भरणे हेच लोकांचे लक्ष्य असेल.

Trending