आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कलियुगात केव्हा-कोठे जन्म घेणार भगवान, कोण असतील आई-वडील, हे सांगतात ग्रंथ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हणतात की, कलियुग म्हणजे कलह क्लेशाचे युग, ज्या युगामध्ये सर्वांच्या मनात असंतोष आणि प्रत्येकजण मानसिक स्वरुपात दुःखी असेल. हिंदू धर्मग्रंथामध्ये चार युग सांगण्यात आले आहेत. सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सतयुगात लोकांमध्ये छळ, कपट आणि दंभ नव्हता. त्रेतायुगामध्ये अधर्म एक अंश आपले पाय रोवण्यात यशस्वी होतो. द्वापार युगात धर्म अर्धाच राहतो. कलियुग आल्यानंतर तीन अंशात या जगावर अधर्माचे आक्रमण होते. कलियुगामध्ये धर्माचा एक चतुर्थांश अंशच शिल्लक राहतो. कलियुगानंतर जसे-जसे दुसरे युग जवळ येते, त्याप्रमाणे मनुष्याचे आयुष्य, वीर्य, बुद्धी, बळ आणि तेज या गोष्टींचा -हास होत जातो.

कलियुगाच्या शेवटी या संसाराची अशी दशा होईल...
लोक केवळ मांसाहार करतील आणि बकरीचे दुध पिऊ लागतील. गाय दिसणारच नाही. सर्वजण एकमेकाला लुबाडण्याचा प्रयत्न करतील. व्रत नियमांचे पालन करणार नाहीत. या उलट वेदांची निंदा करतील. स्त्रिया कठोर स्वभावाच्या आणि कटू बोलू लागतील. पतीच्या आज्ञेचे पालन करणार नाहीत. अमावस्या नसतानाही सूर्य ग्रहण लागेल. स्वतःचा देश सोडून इतरांच्या देशात वास्तव्य करणे चांगले वाटू लागेल. व्यभिचार वाढेल.

कलियुगाच्या सर्वात शेवटच्या चरणात मनुष्याचे आयुष्य सोळा वर्षांचे असेल. वयाच्या सातव्या-आठव्या वर्षीच पुरुष आणि स्त्री समागम करून आपत्य उत्पन्न करतील. पती व पत्नी एकमेकांपासून संतुष्ट राहणार नाहीत. कोठेही मंदिर नसतील. युगाच्या अंतामध्ये प्राण्यांची कमतरता जाणवेल. तारकांची चमक कमी होईल. पृथ्वीवर उष्णता वाढेल. अशावेळी सतयुगाचा आरंभ होईल आणि त्या काळातील प्रेरणेपासून भगवान विष्णूंचा कल्की अवतार होईल.

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या, कोठे होणार भगवान कल्कीचा जन्म आणि त्यांच्या आई-वडिलांचे नाव...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)