आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठे तंत्र केंद्र आहे देवीचे हे मंदिर, कामदेवाला येथेच प्राप्त झाले पूर्वरूप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कामाख्या मंदिर गुवाहाटीपासून 8 किलोमीटर दूर पर्वतावर स्थित आहे. हे स्थान तंत्र शक्तीचे उग्र पीठ मानले जाते. या मंदिराविषयी विविध दंतकथा प्रचलित आहेत. येथे प्रत्येक वर्षी सौर आषाढ मासातील मृगशिरा नक्षत्राचे तृतीय चरण पूर्ण झाल्यानंतर चतुर्थ चरणाच्या मध्यात पृथ्वी ऋतूवती झाल्यानंतर अम्बुवासी मेळा भरतो. धार्मिक मान्यतेनुसार भगवान विष्णूच्या चक्राने खंडित झाल्यानंतर सतीची योनी नीलांचल पर्वतावर पडली होती.

51 शक्तीपीठांमध्ये कामाख्या महापीठाला सर्वश्रेष्ठ मानण्यात आले आहे, कारण येहते योनीची पूजा होते. याच कारणामुळे अम्बुवासी मेळा भरल्यानंतर तीन दिवस मंदिरात कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही. चौथ्या दिवशी मंदिराचे पट उघडले जातात आणि विशेष पूजेनंतर भक्तांना दर्शन करू दिले जाते. कामाख्या पीठ तांत्रिक, मांत्रीकांसाठी सर्वात मोठे आस्था केंद्र आहे. तांत्रिक या ठिकाणाला सर्वात मोठे सिद्धीदायक शक्तीपीठ मानतात. या मंदिरात लोक इच्छा पूर्ण झाल्यानंतर कोंबडा किंवा बोकडाचा बळी देतात.

अम्बुवासी मेळा चालू असताना चार दिवस कोणतेही शुभकार्य होत नाहीत. साधू आणि विधवा अग्नीला स्पर्श करत नाहीत. मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर भक्त देवीला अर्पण करण्यात आलेल्या लाल कपड्याचा तुकडा प्राप्त करून धन्य होतात. असे मानले जाते की, रतीचा पती कामदेवने आपले पूर्वरूप येथेच प्राप्त केले होते. यामुळे कामाख्या मंदिरात दर्शन केल्यानंतर ब्रह्मपुत्र नदीमध्ये स्थित असलेल्या उमानंद मंदिरात जाण्याची प्रथा आहे.

पुढे वाचा, कामाख्या मंदिराचा इतिहास....